Health Benefits: भाजलेल्या चण्यासोबत खा `हा` गोड पदार्थ; आरोग्यासाठी ठरेल असं फायदेशीर
Health Benefits: आधी करोना आणि आता आपल्याला गोवरचा (measles) धोका जाणवू लागला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची (health) काळजी घेणे आवश्यक झाले आहे. त्यातून वातावरण बदलांमुळे सगळीकडे अस्वच्छता आणि रोगराई वाढू लागली आहे.
Health News: सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या सर्वांचे सुदृढ आहाराकडे (lifestyle) दुर्लक्ष होत आहे. धावपळीच्या या युगात आपण सतत बाहेरचं खातोय आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवरही होतो आहे. त्यातून आजूबाजूला आता रोगराईचे (diseases) प्रमाणही वाढू लागले आहे. आधी करोना आणि आता आपल्याला गोवरचा (measles) धोका जाणवू लागला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची (health) काळजी घेणे आवश्यक झाले आहे. त्यातून वातावरण बदलांमुळे सगळीकडे अस्वच्छता आणि रोगराई वाढू लागली आहे. त्यातूनही अनेक प्रकारचे रोग वाढू लागले आहे. याचा परिणाम लोकांच्या मानसिकतेवरही (mental health) होतो आहे कारण घरात कोणालाही कसला आजार झालाच तर त्यामुळे त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनाही आर्थिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळी आरोग्यासंबंधित अनेक आव्हानं आपल्यासमोर असताना आपल्याला बाहेरचं अनहायजिनिक फूड खाणं टाळून (unhygienic) अधिक आरोग्यदायी पदार्थांचा अवलंब करणे आवश्यक ठरले आहे. (health news what are the benefits of roasted chickpeas and jaggery channa and gul)
सध्या आम्ही तुम्हाला अशाच दोन पदार्थांचे महत्त्व समजावून सांगणार आहोत. हे पदार्थ तुमच्या घरी नक्कीच उपलब्ध असतील यात काहीच शंका नाही. भाजलेले चणे (roasted chickpeas) तुम्ही नक्कीच आवडीनं खात असाल त्याचंसोबतच तुम्हाला आणखी एका पदार्थाची भर करायची आहे. चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत त्याचबरोबर भाजलेल्या चण्यांसोबत जर तुम्ही गुळ खाल्ला तर तुमच्या शरीरातील (health problems0 अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. भाजलेल्या चण्यासोबत जर का तुम्ही गुळ खाल्लात तर रक्ताच्या समस्यांपासून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तेव्हा जाणून घेऊया नेमके या दोन पदार्थांचे ते एकत्र खाल्ल्यानं आरोग्यासाठी काय फायदे (health benefits) होऊ शकतात.
हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
का करावा आहारात समावेश ?
वर म्हटल्याप्रमाणे, अनेक लोकांची जीवनशेैली त्यांच्या कामामुळे(work and stress) आणि तणावामुळे बिघडली आहे. अनेकांना पोटाचे विकारही जडू लागले आहेत, त्यातून सारखं बाहेरचं खाल्लानं अनेक जण विविध आजारांनीही त्रस्त आहेत. अशावेळी अनेकांना रक्ताची कमतरताही (blood) उद्भवू शकते. तेव्हा अशावेळी तुम्ही भाजलेले चणे आणि गुळाचे (Jaggery) सेवन करू शकता. या दोन्ही घटकांमध्ये चांगली जीवनसत्त्वे असतात. गुळामध्ये लोह अधिक प्रमाणात आढळते. जे अॅनिमियावर परिणामकारक असते. गुळ भाजलेल्या चण्यासोबत खाल्ल्याने लोह आणि प्रथिने या दोन्ही महत्त्वपुर्ण घटकांची कमतरता जाणवतं नाही.
पाहा कशावर आहे गुणकारी
या दोन्ही घटकांमध्ये पोटॅशिअम (potassium) असते ज्यामुळे तुम्हाला हृदयासंबंधीत आजार होत नाहीत, त्याचसोबतच यात कॅल्शियम (calcium) असते ज्यामुळे हाडं मजबूत होतात आणि हाडांसंबंधी कोणतेच आजार उद्भवतं नाहीत. त्याचसोबत यात फायबर (Fiber) असते ज्यानं बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)