मुंबई : खराब लाईफस्टाईलमुळे अनेक लोकांना आरोग्याशीसंबंधीत काही समस्या तयार झाल्या आहेत. यामध्ये वजन वाढणे ही बहुतांश लोकांसाठी समस्या होऊन बसली आहे. मग आपलं वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. जसे की, अन्न कमी करणे किंवा संपूर्ण अन्न सोडणे, फक्त हिरव्या भाज्या खाणे, धावणे किंवा चालने. या सारखे पर्याय निवडतात. परंतु यासगळ्यात लोक सगळ्यात मोठी चुक करतात ती पाण्यासंबंधीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे लक्षात घ्या की, पाण्याची वेळ पाळणं हे वजन कमी करण्यासाठी फार महत्वाचं आहे. असे मानले जाते की वजन कमी करताना योग्य वेळी पाणी प्यायल्यास खूप फायदा होतो, चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, वजन कमी करण्यापासून ते आपल्या रोजच्या आयुष्यात पाणी पिण्याची एक योग्य वेळ आहे. पाणी आपल्याला अनेक प्रकारे मदत करू शकते. जसे की, योग्य प्रमाणात पाणी अनेक प्रकारच्या आजारांवर मदत करू शकते. पचनास मदत होते, परंतु हे सर्व फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही योग्य वेळी पाणी प्याल.


सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या


सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे आवश्यक आहे. अनेक अहवाल आणि आहारतज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यानंतर एक किंवा दोन कप पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण जेव्हा तुम्ही झोपत असता तेव्हा तुम्ही पाणी पीत नाही, अशावेळी शरीर डीहाइड्रेट होते. अशा स्थितीत सकाळी पाणी प्यायल्याने चयापचय वाढतो आणि पचनालाही मदत होते. त्यामुळे सकाळी एक ते दोन ग्लास साधं पाणी प्या.


आणखी कोणत्यावेळी तुम्ही पाणी पिऊ शकता?


भूक लागल्यावर पाणी प्यावे. अशा वेळी पाणी प्यायल्याने तुम्ही खाण्याच्या चुकीच्या सवयी टाळू शकता. डिहायड्रेशनमुळे, आपल्याला अनेकदा भुकेचे चुकीचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला भूक लागेल तेव्हा तेव्हा पाणी प्या.


अन्न खाण्यापूर्वीच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण पाणी प्यायल्याने तुमचे पोट भरेल आणि त्यामुळे तुम्ही जेवण कमी कराल. रात्रीच्या जेवणाच्या वेळी तुम्ही ही युक्ती अवलंबू शकता.


व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर पाणी प्यावे. यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहाल, व्यायामादरम्यान तुमचे शरीर घाम सोडते, त्यामुळे तुम्हाला वर्कआउट केल्यानंतर आणि करण्यापूर्वी पाणी पिणं गरजेचं आहे.