High Cholesterol Symptoms and Causes : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकजण त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीच. मात्र आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे ते मोठ्या आजारांना बळी ठरू शकतात. अशातच्या कोलेस्ट्रॉलची ( Cholesterol Symptoms and Causes) समस्या झपाट्याने वाढत आहे. रक्तातील घाणेरड्या घटकांचे प्रमाण वाढते हे ह्रदयासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे ह्रदयाशी संबंधित आजार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोस सारखे गंभीर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात. उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या हृदयासाठी शत्रूसारखे आहे. ते हळूहळू तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करतात. अशावेळ लोक बरेचदा उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे मार्ग शोधत असतात. अशा परिस्थितीत काही नैसर्गिक डिटॉक्सिफायर काम करू शकतात आणि या नैसर्गिक डिटॉक्सिफायर्सपैकी एक म्हणजे पाणी...


जास्त पाणी पिण्याची गरज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलेस्ट्रॉक (Cholesterol)  कमी करण्यासाठी जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) आणि वजन कमी होण्यास मदत होते. खरं तर पाणी तुमच्या रक्तवाहिन्यांमधून चरबी आणि ट्रायग्लिसरायड्स काढून टाकण्यास मदत करू शकते. तसेच उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णाने दररोज 8 ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. कारण तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितक्या वेगाने तुमचा चयापचय दर वाढेल. याच्या मदतीने तुम्ही पाणी पीत राहाल आणि ते अन्नातून बाहेर पडणाऱ्या चरबीचे प्रमाण पचवण्यास मदत करेल. याशिवाय अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल, ज्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.


वाचा : तुम्ही Instagram Reels बनवत असाल तर 'या' गोष्टी नक्की तपासा, होईल फायदा! 


कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत


जास्त पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच हृदयविकार कमी होण्यास मदत होते. तसेच हे शरीरातील कोलेस्टेरॉलचा कचरा साफ करण्यास आणि काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते. परिणामी यावर उपाय म्हणून उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये जास्त पाणी पिणे गरजेचे असेल. 


कोलेस्ट्रॉल कसा कमी कराल?


हेल्टी आहार, व्यायाम आणि काही प्रमाणात ठराविक औषधे यांच्याद्वारे कोलेस्ट्रॉल कमी होण्याची शक्यता आहे. दारू असो वा धूम्रपान, या दोन्ही गोष्टी रक्तवाहिन्यांना इजा करतात. धुम्रपानामुळे रक्तपेशींमध्ये रक्तप्रवाह गतिमान होतो, ज्यामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहा. अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढू शकते.  


कोलेस्ट्रॉलची ही आहेत लक्षणे 


  • थकवा जाणवणे 

  • उलट्या होणे 

  • रक्तदाबात अचानक वाढ 

  • छाती दुखणे 

  • शरीराच्या खालच्या भागात थंडपणा