Neem Benefits In Marathi: कडुलिंबाची पाने आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप फायद्याची आहेत. कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कडुलिंबाची पाने चवीला कडू असली त्याचे महत्त्व फार आहे. याची पाने चावून खाल्ल्यास अनेक आजारांवर मात करता येऊ शकते.   कडुनिंबामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि टॉक्सिन काढून टाकणारे गुणधर्म असतात. अनोश्यापोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास शरीराला अनेक लाभ मिळतात. रोज पाच ते सहा पाने चावून खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात जाणून घ्या. 


रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते


भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खराब लाइफस्टाइल  आणि वेळी-अवेळी झोपणे यामुळं मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढते. मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही घरातीलच रामबाण उपाय वापरू शकता. उपाशीपोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवता येते. 


रक्त साफ होते


कडुलिंबाच्या पानात अनेक औषधी गुण असतात ज्यामुळं शरीरातील रक्त स्वच्छ होते. कडुलिंबाची पाने रक्तातील टॉक्सिन शरीरातील बाहेर टाकून देतात व रक्त डिटॉक्स करतात. जर रक्त स्वच्छ असेल तर तुम्हाला कोणाताही आजार होऊ शकत नाही.


पोटासाठी फायदेशीर


कडुलिंबाची पाने त्वचेसाठी फायदेशीर आहेतच पण पोटासाठीही लाभदायक आहेत. यातील औषधी गुणधर्म अॅसिडिटीसाठी खूपच फायदेशीर आहेत. सकाळी उपाशीपोटी कडुलिबांची पाने पाण्यात उकळवून पिण्याने अॅसिडिटी आणि पोटदुखी कमी होते. 


रोगप्रतिकार शक्ती वाढते


कडुलिंबाच्या पानात अनेक प्रकारच्या जीवनसत्वे, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट असतात. यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. इतकंच नव्हे तर, सर्दी, खोकलासारखे आजार दूर करण्यासाठीही कडुलिंबाचा काढा करुन प्यायला जातो. 


कडुलिंबाच्या पानांचे सेवन कसे करावे


कडुलिंबाच्या पानांचा रस काढून त्याचे सेवन केले जाते. पण लक्षात ठेवा नेहमी ताज्या पानांचा रस काढूनच त्याचे सेवन करावे. 


कडुलिंबाच्या पानाचे सेवन करताना ही काळजी घ्या. 


एकाचवेळी जास्त कडुलिंबाच्या पानांचे सेवन करणे नुकसानदायक ठरु शकते. कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ल्यास त्याचे फायदे मिळतात. काही जणांचा असा समज असतो की, जेवढ्या अधिक प्रमाणात कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास तितके पोषण अधिक मिळेल. मात्र, तसा समज चुकीचा आहे. नेहमी कमी प्रमाणातच त्याचे सेवन करावे. तसंच, आपल्या आहारात कडुलिंबाच्या पानांचा समावेश करण्याआधी डॉक्टरांसोबत एकदा बोलून घ्या.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)