health Tips in Marathi : दही खाणे आरोग्यासाठी (Eating yogurt for health) चांगले असते. यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही अधिक असते. दही हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. दही मध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे, बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. सुमारे 100 ग्रॅम दह्यामध्ये 3.5 ग्रॅम प्रथिने असतात. याशिवाय त्यात अनेक पौष्टिक घटक असतात, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात उच्च दर्जाचे प्रोबायोटिक्स किंवा चांगले बॅक्टेरिया असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आयुर्वेदानुसार दह्याचे सेवन केल्याने गॅस, ब्लोटिंग सारख्या समस्या वाढू शकतात. मात्र उन्हाळ्यात अशा वेळी पोट निरोगी आणि थंड ठेवण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेकदा दही खाल्ल्यानंतर लोकांना पिंपल्स, स्किन अॅलर्जी आणि पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच काहीजणांतर थोडे दही खाल्ल्यानंतर शरीरात खूप उष्णता जाणवते. अशावेळी दहीचे रोज सेवन करणे चांगले की वाईट याबद्दल जाणून घ्या...


दही खाल्ल्यानंतर शरीरातील उष्णता वाढते का?


लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना दही खाय्यला सर्वांना आवडते. पण आयुर्वेदानुसार दह्याची चव आंबट असते आणि त्याची प्रकृती उष्ण असते. तसेच दही पचण्यास खूप कठीण असते. त्यामुळे पित्त आणि कफ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.  म्हणूनच दही खाताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य प्रकारे दह्याचे सेवन केले तर तुम्हाला त्यापासून कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही किंवा ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होणार नाही.


वाचा: Whisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट


दही कसे खावे? (How to eat curd)


उन्हाळ्यात रोज दही खाण्याऐवजी ताक पिया. तुम्ही त्यामध्ये काळे मीठ, काळी मिरी आणि जिरे टाकून पिऊ शकता. दह्यात पाणी मिसळल्याने दह्याचे उष्णतेचे प्रमाण कमी होते. तसेच दह्यामध्ये पाणी घातल्याने त्याची उष्णता कमी होते आणि कूलिंग इफेक्ट मिळतो.


यासोबतच दही गरम केल्यानंतर ते खाऊ नयेत. असे केल्याने दह्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात. तसेच, जर तुम्हाला लठ्ठपणा किंवा कफ दोषाचा त्रास होत असेल तर आसल टार दही खाणे टाळा. आयुर्वेदानुसार दही फळांमध्ये मिसळूनही खाऊ नये. असे केल्याने तुम्हाला पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ज्या लोकांना आधीच फुगण्याची आणि गॅसची समस्या आहे. दही त्यांना जास्त अस्वस्थ करु शकते, परंतु असे फार कमी लोकांमध्ये होते. जर तुम्हाला दह्यामुळे त्रास होत असेल तर हिंग टाकूनही दही खावू शकता. 


रोज दही खाण्याचे तोटे (Disadvantages of eating curd daily)


जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर तुम्ही रोज दह्याचे सेवन करु नये. जर पचनसंस्था नीट काम करत नसेल तर दही खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही रोज एक कपपेक्षा जास्त दही खाल्ले तर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल. जर तुम्ही फक्त एकच कप दही खाल्ले तर तुमचे नुकसान होणार नाही. दह्याचे सेवन हाडे आणि दातांसाठी चांगले असते. कारण त्यात कॅल्शियम भरपूर असते. सांधेदुखीच्या रुग्णाने दही खाल्ल्यास वेदनांचा त्रास अधिक वाढू शकतो.  दह्यात लॅक्टोज असते. लॅक्टोज ही दुधातील साखर आहे जी लॅक्टेज एन्झाइमद्वारे पचवली जाते. तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा एन्झाइमची कमतरता असल्यास, दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने सूज आणि गॅस होऊ शकतो. जर तुम्हाला लैक्टोज असहिष्णुता असेल तर दही माफक प्रमाणात खा.