Fennel Seeds Milk Benefits: आपण आपल्या आरोग्याची काळजी नेहमी घेत असतो. मात्र, तब्बेत कधी कधी अचानक बिघडते. आपले बिघडलेले आरोग्य चिमुटभर बडीशेप ठिक करते. दूध आणि बडीशेप या दोन्हीमध्ये औषधी गुणधर्म समान आहेत. प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे अनेक पोषक घटक दुधात असतात, तर बडीशेपमध्ये तांबे, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम, मॅंगनीज, लोह आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. दूध हाडे आणि स्नायूंसाठी चांगले तर बडीशेप खराब पचन सारख्या अनेक रोगांवर फायदेशीर आहे. दूध आणि बडीशेप एकत्र करुन पिण्याचे अनेक फायदे आहेत.


पचनासाठी चांगले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बडीशेपचे दूध पचनासाठी फायदेशीर आहे. अनेकांच्या शरीरात दुधाचे पचन नीट होत नाही. अशा परिस्थितीत अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. दुधात बडीशेप मिसळून प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. बडीशेप पचन सुधारण्यास मदत करते. 


दुर्गंधीपासून सुटका होते


अनेकांना तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असते. चहा किंवा दूध यांसारख्या वस्तू प्यायल्यानंतर ही दुर्गंधी अधिकच वाढल्याचे दिसून येते. तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका हवी असेल, तर बडीशेप दुधात मिसळून पिणे खूप फायदेशीर ठरते.


दृष्टी सुधारणे


बडीशेपमध्ये अनेक पोषक घटक असतात. डोळ्यांसाठी ते खूप फायदेशीर असतात. बडीशेपचे सेवन दृष्टी चांगली राहण्यासाठी होते. तसेच दुधाबरोबर तिचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच आरोग्यासाठी दूध आणि बडीशेप खाणे चांगले ठरते.  बडीशेपच्या सेवनाने दृष्टी वाढते. याचे दुधासोबत सेवन करणे फायदेशीर ठरते. साखरेसोबत बडीशेप खाणे देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


मासिक पाळीत फायदेशीर


मासिक पाळीच्या काळात बडीशेपचे सेवन करणे फायदेशीर आहे. जर तुमची मासिक पाळी अनियमित होत असेल तर तुम्ही बडीशेपच्या सेवनाने या समस्येपासून सुटका मिळवू शकता. मासिक पाळी दरम्यान दूध प्यायचे असेल तर बडीशेप मिसळून प्यायल्यास फायदा होईल.


स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल


बडीशेपयुक्त दूध प्यायल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. बडीशेपमध्ये असलेले पोषक तत्व मेंदूला ताजेतवाने आणि सक्रिय बनविण्यास मदत करतात. रात्री अभ्यास करताना तुम्ही कॉफीऐवजी बडीशेप मिसळून दूध घेऊ शकता. 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)