Health Tips: Diabetes रुग्णांसाठी `इंग्लिश चिंच` गुणकारी, जाणून घ्या कशी ठरते प्रभावी
इंग्लिश चिंच या फळात विटामिन सी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस, आयर्न, थायमिन, रायबोफ्लेविन यासारखी तत्त्व असतात. इंग्लिश चिंचेचं नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते.
Diabetes Patient Health Tips: डायबेटिज रुग्णांसाठी इंग्लिश चिंच गुणकारी आहे. इंग्लिश चिंच ही जंगली जलेबी, गंगा जलेबी, गोड चिंच या नावाने देखील ओळखली जाते. जंगली चिंच मॅक्सिकोतील जंगलातून आपल्या भारतात रुजली, असं बोललं जातं. इंग्लिश चिंचेला Pithecellobium Dulce असं वैज्ञानिक नाव आहे. चिंचेतील गर पांढरा असतो आणि पिकल्यावर लाल होते. इंग्लिश चिंच या फळात विटामिन सी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस, आयर्न, थायमिन, रायबोफ्लेविन यासारखी तत्त्व असतात. इंग्लिश चिंचेचं नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते. त्यामुळे इंग्लिश चिंचेला इम्युनिटी बूस्टर संबोधलं जातं.
-इंग्लिश चिंच वनस्पतीचा प्रत्येक भाग आयुर्वेदिक औषध म्हणून वापरता येतो. त्यात अँटी-डायबेटिक गुणधर्म असल्यामुळे डायबेटीज रुग्णांसाठी गुणकारी असल्याचे सिद्ध होते. याच्या पॉड अर्कमध्ये हायपरग्लाइसेमिक विरोधी गुणधर्म आहेत जे टाइप 2 मधुमेहावर प्रभावी ठरते.
-इंग्लिश चिंचमध्ये अँटी-ऑक्सिडंटचा गुणधर्म असतो. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
-सांधेदुखी आणि सांधेदुखीसाठी इंग्लिश चिंच प्रभावी आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. यामुळे रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
Health Tips: 'या' सवयींमुळे Kidney चं होतं नुकसान! अशा चुका करू नका
-इंग्लिश चिंचेचं टरफळ काढून त्यातला गर खा. त्याचे बी मात्र खाऊ नका. काही जण ही चिंच सुकवून खातात.
-इंग्लिश चिंच प्रभावी असली तरी काही जणांनी याचं सेवन करू नये, असं आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. गर्भवती महिलेने खाऊ नये. स्तनपान करणाऱ्या महिलांनीही चिंच खाऊ नये.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)