Anger control tips: राग कंट्रोल करण्याचा विचार करताय? मग आधी हे वाचा
राग येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे.
मुंबई : राग आलाय...हे ऐकण्यासाठी फार छोटी गोष्ट वाटते. मात्र ही एक मोठी आणि गंभीर समस्या आहे. आजकाल अनेकांना पटकन राग येतो. इतकंच नाही तर शांत व्यक्ती देखील काही वेळा रागराग करताना दिसतात. मुळात राग येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. अनेकदा आपण रागाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो मात्र काही जणांना राग कंट्रोल करणं शक्य होत नाही.
व्यक्तीला राग आला की त्याच्या मानसिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे चिंता, उदासीन, डोकेदुखी तसंच बीपी इत्यादी शारीरिक समस्या देखील उद्भवतात. जर तुम्हाला राग कंट्रोल करायचा असेल तर खाली दिलेल्या टीप्स नक्कीच तुम्हाला मदत करू शकतात.
दीर्घ श्वास घ्या
ज्यावेळी तुम्हाला राग येईल त्यावेळी डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुम्हाला तुमचा रागातून मुक्ती मिळण्यास मदत मिळेल. मेडिटेशनमध्येही या प्रक्रियेचा समावेश आहे. दीर्घश्वास तुम्हाला तणावातून मुक्त करण्यासाठी मदत करेल. यामुळे तुमचं मनंही शांत होईल.
तुमचं आवडतं गाणं ऐका
चांगलं संगीत तुमचा राग आणि मनाला शांत करतो. म्युजिक थेरेपी तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना रोखण्यास मदत करते. चांगलं संगीत ऐकल्याने तुम्हाला राग आलेल्या गोष्टीवरून ध्यान हटवण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
विश्वासू मित्रांशी बोला
जर तुमचा कोणी विश्वासू मित्र किंवा मैत्रिण असेल तर त्या मित्राशी तुम्ही तुमच्या भावना शेअर करू शकता. तुम्ही कसं फील करताय हे एखाद्याला सांगणं हे रागातून बाहेर येण्याचा एक चांगला पर्याय मानला जातो.
काही वेळ एकटे रहा
जर तुमचं कोणा व्यक्तीशी फोनवरून भांडण झालं असेल तर काही वेळ एकटे रहा. अशावेळी एका शांत रूममध्ये काहीवेळ झोप घ्या. लोकांमध्ये मिसळणं काही वेळ टाळा. यामुळे तुम्हाला आवश्यक असणारी शांती मिळण्यास मदत होईल.
काही वेळ फिरून या
पायी चालल्याने राग नियंत्रणात येण्यास मदत होते. याशिवाय पायी चालणं स्नायूंना आराम देतात. त्यामुळे जेव्हा कोणाला राग येतो तेव्हा तिथून जास्त न बोलता थोडेसं चालणं चांगलं आहे.