मुंबई : आजकाल अनेकांना शांत  झोप येत नाही. तर काहींना झोपेची समस्या असते. वाढत्या स्पर्धात्मक युगात झोपेचे खोबरे झालेय. त्यामुळे शांत झोपेचा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. शांत झोप येण्यासाठी काही उपाय केले तर झोप चांगली होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोप चांगली येण्यासाठी काही औषधेही बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजेत.  ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्‍स सिरपसारखे सिरप रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत  होऊन झोप लागते. मानसिक अस्वास्थ्यामुळे किंवा असंतुलनामुळे झोप येत नसल्यास ब्राह्मी स्वरसाचे नस्य, क्षीरधारा, शिरोधारा, शिरोबस्ती आदी उपचार करून घेतल्यासही लाभ होतो.


१. जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप झोपण्यापूर्वी कपाळावर लावल्यास गाढ झोप येण्यास मदत होते.    


२. पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप चांगली लागते.


३. ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाल्ले तरी झोप येण्यास मदत होते


४. रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, कानात श्रुती तेलासारखे तेल, नाकात घरी बनविलेले साजूक तूप  नाकात टाकण्यानेही  शांत झोप लागते.    


५. नियमित अभ्यंग तसेच पादाभ्यंग सुद्धा शांत झोपेसाठी मदत करते.