मुंबई : हल्ली वाढलेले वजन ही अनेकांची समस्या बनलीये. त्याचप्रमाणे कमी वजनामुळेही अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागते. वजन कमी करण्याच्या तुलनेत ते वाढवणे नक्कीच सोपे असते. मात्र त्यासाठी योग्य तो आहार घेण्याची गरज असते. 


वजन वाढवण्यासाठी हा हे पदार्थ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केळी - वजन वाढविण्यासाठी केळी खूपच उपयुक्त आहे. केळी खाल्ल्याने तात्काळ उर्जा मिळते. 


बटाटा - सालीसकट बटाटा खाल्ल्याने खूप फायदे होतात. बटाट्यामध्ये कर्बोदके असतात. यामुळे शरीराला फायदा होतो. 


दूध - दुधात प्रोटीन्स तसेच कार्बोहायड्रेट्स असतात. १०० मिली दुधातून ३.४ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. 


अंडी - अंडी खाल्ल्यानेही शरीराला उच्च प्रतीचे प्रोटिन्स मिळतात. अंड्यातील 'व्हिटामिन ए ' 'व्हिटामिन बी १२' आरोग्यास  फायदा होतो. 


मांसाहार- शाकाहाराप्रमाणेच मांसाहार देखील घेणे फायदेशीर आहे. चिकनमधून खूप प्रोटीन्स मिळतात. 


लोणी- वजन वाढवण्यासाठी लोण्याचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा. 


सुकामेवा- वजन वाढविण्यासाठी काजू, बदाम, अक्रोड यासारख्या कॅलरीज देणारा सुकामेवा आहारात नक्कीच घ्या.


सोयाबीन - वजन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी कार्बोहायड्रेट्स पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी याचा खूपच फायदा होतो.