Health News : धावपळीच्या जीवनामध्ये आता आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.  24 तासांमधील 30 मिनिटंही आपण आपल्यासाठी काढत नाही. यामुळे आपलं फार मोठं नुकसान होत आहे. ऑफिसमध्ये कामाच्या वेळेपेक्षा अधिक काम केलं जातं.  दिवसभर ऑफिसमध्ये बसून बसून पायाला सूज येते सूज कमी करण्याचे काही साधे आणि सोपे उपाय आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाच्या घरात सैंधव मीठ उपलब्ध असतं. या मीठाचा वापर करून तुम्ही तुमच्या पायाची सूज कमी करू शकता. कोमट पाणी करा त्यामध्ये काही प्रमाणात सैंधव मीठ टाका आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून ठेवा. तुमच्या पायाची सूज कमी होण्यास मदत मिळेल. 


पाय सुजले असतील तर घरी ठेवलेले बर्फाचे पॅकही यासाठी वापरता येईल. सुजलेल्या भागाला बर्फाच्या पॅकने मसाज करा. थोड्या वेळाने तुम्हाला आराम वाटेल आणि पायांची सूज देखील यामुळे कमी होईल.


सूज कमी करण्यासाठी पायाची मसाजही प्रभावी आहे. यासाठी खोबरेल तेल घ्या आणि ते थोडे गरम करा. या तेलात तुम्ही लसणाच्या पाकळ्या टाका. लसणापासून तयार केलेलं हे तेल पायाला लावा आणि 5 मिनिटं मसाज करा. सूज कमी होण्यास मदत मिळेल.


एक चमचा खोबरेल तेलात एक चमचा हळद मिसळून लेप बनवा. तो लेप सूजलेल्या भागावर लावा. ही पेस्ट सुकल्यावर कोमट पाण्याने पाय धुवा. याने सूज कमी होते.


एक चमचा खोबरेल तेलात हळद मिसळून लेप तयार करा. सूजलेल्या भागावर लावा लेप लावा, लेप लावताना त्याचा शेक पायांना तुम्हाला सोसेल असा द्या. याने तुमच्या पायांची सूज कमी होण्यास मदत होते.