How to Lighten Knees and Elbows: आपल्यापैकी अनेकांची सुंदर दिसण्याची व्याख्या ही चेहऱ्याचे सौंदर्य इतकीच आहे. अनेकजण चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी, चेहऱ्याची त्वचा उजळ होण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग घालवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. चेहऱ्याकडे आवर्जून लक्ष देणाऱ्यांबरोबर आपल्यापैकी अनेकांना याची कल्पना नसते की आपल्या गुडघ्यांबरोबरच हाताच्या कोपरांवरही काळे डाग असतात. सहजपणे या गोष्टीकडे आपलं लक्षही जात नाही. मात्र शॉर्ट कपडे म्हणजेच वन पीस किंवा थ्री फोर्थ अथवा स्लीव्हलेस कपडे घातल्यानंतर हे डाग प्राकर्षाने जाणवतात. अशावेळी आपण या डागांबद्दल फारच विचार करु लागतो. अनेकदा तर हे डाग कमी करणं किंवा घालवता येतील का याचा विचारही आपण करतो. 


घरच्या घरी घालवा हे डाग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यपणे अंघोळ करताना साबण लावून घासल्याने हे डाग कमी होत नाही. मात्र काहीजण वेगवेगळ्या क्रीमच्या मदतीने हे डाग उठून दिसणार नाहीत याची काळजी घेताना दिसतात. मात्र यात फारसं यश येत नाही. त्यामुळेच आजच्या या लेखात आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला गुडघ्यांबरोबरच कोपरांवरील डाग कमी करण्यासाठी मदत करतील. यासाठी तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या नारळाच्या तेलाची मदत घेता येईल. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे डाग घालवता येतील किंवा कमी करता येतील.


तेल फार फायद्याचे


खरं तर नारळाचं तेल हे त्वचेसाठी फायद्याचं असतं. अनेक कॉस्मॅटिक प्रोडक्टमध्ये नारळ्याच्या तेलाचा वापर केला जातो. नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅमीन ई असते. यामुळे त्वेचाचा रंग उजळवण्यास फायदा होतो. तसेच नारळाच्या तेलामुळे त्वचेमधील मॉइश्चर म्हणजेच ओलावा टिकून राहतो. त्यामुळेच हे तेल त्वचेची देखभाल करण्यासाठी आणि प्रामुख्याने ती कोरडी पडू नये यासाठी फार फायद्याचे असते. याच तेलामध्ये एक खास गोष्ट मिक्स केल्यास गुडघा आणि हाताच्या कोपरावरील डाग कमी करता येतील.


तेलात मिक्स करा ही गोष्ट आणि मिळवा डबल फायदा


> अंघोळीनंतर नारळाच्या तेलाने गुडघ्यावर आणि कोपरावर हलक्या हातांनी 10 ते 15 मिनिटं मालिश केली तर त्याचा फायदा होतो. तेल लावल्यानंतर ते संपूर्णपणे कोरडं होईपर्यंत मालिश केली तरी चालते.


> गुडघ्यावर आणि कोपरावर दिवसातून किमान 2 ते 3 वेळा मालिश करणं फायद्याचं ठरतं. अंघोळीनंतर, सायंकाळी घरी पोहोचल्यावर आणि रात्री झोपण्याच्या आधीचा वेळ यासाठी निश्चित करता येईल. 


> नारळाच्या तेलामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून गुडघ्यावर आणि कोपरावर मालिश केली तर अधिक फायदा होतो.


> याचबरोबर गुडघ्यावर आणि कोपरावरील काळे डाग घालवण्यासाठी नारळाच्या तेलामध्ये अक्रोडच्या सालांची पावडर टाकून ती गुडघ्यावर आणि कोपरावर लावावी. हे मिश्रण तयार करुन हलक्या हाताने मालिश करावी. त्यानंतर हे मिश्रण गुडघ्यावर आणि कोपरावर लावून ते चोळावे. त्यानंतर त्वचेवर लावलेले हे मिश्रण अगदी कोरडं पडेपर्यंत ठेवावं आणि नंतर झटकून काढून टाकावं.


> अक्रोडच्या सालीची पावडर नारळाच्या तेलात टाकून लावल्यास ती गुडघ्यावर आणि कोपरावरील डाग घालवण्यासाठी फारच फायद्याची ठरते. मात्र हे मिश्रण नियमितपणे लावणे आवश्यक आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.)