health tips: मानवी शरीराला योग्य पोषक तत्व मिळण्यासाठी  प्रत्येक भाजी आणि  फळ खाणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक फळ असो भाजी असो प्रत्येकातून शरीराला उपयुक्त प्रत्येक घटक आपल्याला मिळतो आणि आपल्या शरीरातील सर्व कमी भरून निघते . बऱ्याचदा काही भाज्या किंवा फळ आपल्याला आवडत नाहीत म्हणून आपण खात नाही पण तुम्हाला माहित आहे का काही अशी फळ आहेत भाज्या  आहेत ज्यामुळे शरीराला अगणित फायदे मिळतात. (health tips: how to contol diabetes just drink one glass carroot juice everyday for a month )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हिवाळा जवळ येऊ लागला आहे आणि या ऋतूमध्ये गाजर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गाजर आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं आहे सतत एक महिना गाजराचा रस प्प्यायल्याने शरीराला खूप फायदे होतात ज्याचा आपण विचार सुद्धा केला नसेल. (benefits of carrot juice to human body)


गाजरांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए (vitamin A), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि के, पोटॅशियम (POTTACIUM) यांसारख्या महत्त्वाच्या पोषक घटक असतात, जे शरीराचे अवयव निरोगी ठेवण्यास आणि गंभीर आजारांच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गाजराच्या रसाचे सेवन केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होऊन चांगले आरोग्य मिळण्यास मदत होते.


गाजराचा रस कॅरोटीनॉइड रंगद्रव्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन देखील प्रदान करतो, जे शरीरात अँटिऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात. अँटिऑक्सिडंट्सचे सेवन अनेक गंभीर आजारांच्या विकासास कमी करण्यास मदत करते. (carrot is very much important to health)


 गाजराच्या रसामध्ये जवळजवळ सर्व पोषक तत्व असतात जे तुमच्या डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात. दररोज 200 ग्रॅम गाजराच्या रसाने व्हिटॅमिन एची आवश्यकता पूर्ण केली जाऊ शकते. 
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी अ जीवनसत्व महत्त्वाचे आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन ए असलेले पदार्थ खाणे तुम्हाला अंधत्व आणि वय-संबंधित डोळ्यांच्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकते. (carrot is beneficial for eye health)


गाजराचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासही मदत होते. टाइप 2 मधुमेह असलेल्या उंदरांवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की गाजराचा रस रक्तातील साखर आणि त्याच्याशी संबंधित इतर मार्कर कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. (carrot juice can control diabetes)