वजन कमी करण्यासाठी भात टाळू नका; तर `या` 6 पद्धतीने करुन पाहा भात, लठ्ठपणा कमी होईल
Weight Loss Rice Recipe: वजन कमी करण्यासाठी तुम्हीपण आहारातून भात हद्दपार करता का? तर थांबा या सात पद्धतीने भात ट्राय करु पाहा
Weight Loss Rice Recipe: वजन कमी करण्यासाठी अनेकजण भात खाणे टाळतात हे तर तुम्ही अनेकदा पाहिले असेलच. काही जण तर भात आहारातूनच हद्दपार करतात. मात्र, भातातही आरोग्यासाठी हवी असेलेले पोषकतत्वे असतात. त्यामुळंच, न्युट्रिशनिस्ट भात वेट लॉसच्या आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर भाताचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहते. भातात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते ज्यामुळं वजन कमी करण्यास हे फायदेशीर ठरते. त्याचबरोबर भात ग्लूटन फ्रीदेखील असतो.
आरोग्यतज्ज्ञ आरजू सेठी यांनी एक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. त्यात त्यांनी भाताचा आहारात का समावेश करावा याची कारणे तर सांगितले आहेतच. पण भाताच्या सात रेसिपीदेखील सांगितल्या आहेत. त्यामुळं भात आरोग्यासाठी पौष्टिक आणि वजन नियंत्रणात ठेवू शकतो. भाताच्या या रेसिपीमुळं आरोग्याला पोषण मिळेल. कॅलरी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. ब्लड शुगर नियंत्रणात राहते. एनर्जी लेव्हल वाढवते, हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.
पनीर राइस बॉलः भात शिजवत असताना त्यात पनीर टाका. तुम्ही गार्नीशसाठी पनीर वापरले तरी चालेल. किंवा पनीर क्रिमी, फ्राइड किंवा तंदुरी करुन भातात टाकून खाऊ शकतात.
सोया पुलावः भात किंवा सोय चंक्सपासून बनवलेला सोया पुलावा चवीला खूप जास्त चांगला आहे. त्याचबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. या पद्धतीने भात खाल्ल्यास शरीराला कार्ब्स आणि प्रोटीन मिळतात. हा भात रायतासोबतही खाऊ शकतो.
क्रिमी कॉर्न स्पिनेच राइस बॉलः कॉर्न, पालक, कांदा, भात, काळी मिरी, दालचिनी, लंवग, हळद आणि क्रिम टाकून तुम्ही क्रिमी कॉर्न स्पिनेच राईस तयार करु शकता.
मशरुम राइस बॉलः आरोग्यासाठी मशरूम खूप फायदेशीर आहे. त्यामुळं भात आणि मशरुम एकत्र खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. मशरुम राइस लॉ कॅलरी डिश आहे. तसंच, बनवण्यासाठीदेखील सोप्पी आहे. एक वाटी भातासोबत क्रीमी मशरुम तुम्ही सर्व्ह करु शकता.
दही तडका राईसः दह्याला फोडणी देऊन तुम्ही ते भातासोबत खावू शकता. लंच किंवा डिनरमध्ये तुम्ही हा भात खावू शकता. यामध्ये काजू, बीट, कॉर्न टाकूनही तुम्ही भात बनवू शकता.
टोफू आणि छोलेचा पुलावः सोयापासून बनवलेला टोफू फायबरयुक्त असतो. यातून शरीराला कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते. या भातात छोले, टोफू, कांदा आणि ब्रोकोली टाकू शकतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)