गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात...
Cooking Chapati on Tawa or Direct Flame : आपल्या रोजच्या जेवणात चपाती, पोळी किंवा फुलका, भाकरी हा अविभाज्य भाग आहेत. भाकरी, चपाती, फुलका बनवण्याची पद्धत देशभर सारखीच आहे. फक्त ती चांगली भाजली जावी, खमंगपणा यवा, म्हणून आजही चपाती, भाकरी, फुलके चुलीच्या ज्वाला किंवा विस्तवा अथवा निखाऱ्यावर भाजली जाते. तसेच अशा प्रकारे भाजलेली चपाती, भाकरी खायलाही चवदार लागत असते. मात्र हल्ली चपाती किंवा भाकरी भाजण्याचे काम गॅसवर केले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या प्लिअर्समुळे हे आणखी सोपे झाले आहे. पण अशा भाजलेल्या चपातींमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, असे एका संशोधनातून पुढे आले आहे.
गॅसच्या बर्नरवर चपाती किंवा भाकरी भाजल्याने नेमके काय होते?
गॅसवरील बर्नरवर भाकरी किंवा चपाती भाजल्याने भाकरी-चपातीमध्ये हेटेरोसायक्लिक अमाइन आणि पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स तयार होतात. त्यांना कार्सिनोजेन्स म्हणतात. या घटकांच्या सेवनामुळे मानवी कर्करोगाचा धोका असतो. पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित न्यूट्रिशन अँड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे.
कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि सूक्ष्म कण गॅसवर चालणाऱ्या शेगडीतून जळत्या ज्वालांमधून बाहेर पडतात. हे पदार्थ थेट चपातीत असतात, जागतिक आरोग्य संघटनेनुसार हे घटक आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे मानवाला श्वसन व हृदयाशी संबंधित विकार होऊन कर्करोग होण्याचा धोका असतो. गरम ज्वाळांवर भाजताना गव्हामध्ये असलेली नैसर्गिक साखर आणि प्रथिने एकत्र गरम केल्यावर त्यातून तयार होणारे रासायनिक ऍक्रिलामाइड शरीरासाठी घातक ठरते. अनेक वर्षे चुलीवर शिजवताना निखाऱ्यावर भाकरी, चपाती भाजली जायची. पण अशीच कृती जर तुन्ही गॅसव केली तर तुमच्या जीवावर धोकादायक ठरु शकते. त्यामुळे तुम्ही पण जर गॅसच्या बॅर्नरवर जर चपाती किंवा भाकरी भाजत असाल तर वेळीच सावध व्हा... तुम्हाला जर चपाती किंवा भाकरी बनवायची असेल तर तुम्ही हलक्या कपड्यांसह भाकरी चपाती दाबून करु शकता. त्यामुळे चपाती आणि सर्व पदार्थ व्यवस्थित शिजतात.
संशोधनातून आले समोर
तसेच जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की, कुकटॉप्स आणि एलपीजी गॅस स्टोव्हमधून नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यासारखे अनेक धोकादायक वायू उत्सर्जित होत असतात. हे वायू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने म्हटलं आहे. या खतरनाक वायूपासून श्वसनाच्या आजारांसोबतच कॅन्सर आणि हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. एवढंच नाही तर आपल्या जीवाला धोका निर्माण होतो असही या अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.