Toothache Home Remedies: दाताचे दुखणे वाढायला लागले की खूप वेदना सहन कराव्या लागतात.  कधी कधी तर हे दुखणं खूपच असह्य होऊन जाते. वेदना इतक्या वाढत जातात की काही खाणं ही कठीण होऊन बसते. दातदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. मात्र, आम्ही तुम्हाला आज दातदुखीवर रामबाण उपाय सांगणार आहोत. आपल्या किचनमध्ये असलेल्या पदार्थांमुळं तुम्ही दाताच्या वेदनेवर मात करु शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मौखिक आरोग्य सांभाळणे हे आजच्या जगात महत्त्वाचे आहे. रोज दोन वेळा ब्रश करणे इतक्यापर्यंत न राहता मौखिक आरोग्य सांभाळण्यासाठी आपण्या खाण्या-पिण्यावरदेखील नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. दातादुखीबद्दल बोलायचे झाल्यास वेगवेगळ्या कारणांमुशं दातात वेदना होऊ शकतात. दात नीट साफ न करणे, गोड अतिप्रमाणात खाणे, प्रोसेस्ड फूड खाणे, कॅल्शियमची कमी, ब्रश करताना जीभेची स्वच्छता न करणे, कारण जीभेवर बॅक्टेरिया जमा होऊ लागले की हिरड्या व दातांचेही नुकसान होते. या व्यतिरिक्त बॅक्टेरिअल इन्फेक्शन किंवा दातांना किड लागणे यामुळंही दातांमध्ये वेदना निर्माण होऊ शकते. 


दाताच्या वेदनेपासून आराम कसा मिळवाल?


पेपरमिंट टी बॅग


दातदुखी सुरू झाल्यास तुम्ही पेपरमिंट टी बॅग फ्रीजमध्ये काही वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर जिथे वेदना होत आहेत त्या जागी टी बॅग ठेवा. जर दुखणे सहन करण्यापलीकडे गेले असेल तर तुम्ही गरम टी बॅगदेखील ठेवू शकता. पेपरमिंट वेदना निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांपासून लढण्यास मदत करते आणि वेदनेपासून आराम देते.


लवंग


दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी लवंग हे खूप प्रभावी आहे. यासाठी 5 ते 6 लवंग घेऊन त्याची पावडर तयार करा. यानंतर लवंगाची पावडर ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून ती पेस्ट जिथे दातदुखी आहे तिथे लावावी. यामुळं काहीच वेळात दुखण्यापासून आराम मिळतो. 


लसूण


जेवणाची रंगत वाढवणारा लसूण दातदुखीवर आराम मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही लसणाचा चहा बनवून पिऊ शकता किंवा लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यासही आराम मिळेल. जिथे वेदना होत आहेत त्या जागी लसणाची पेस्ट टावू शकता. लसणात असलेले अँटी बॅक्टेरिअल गुण दातातील बॅक्टेरियापासून लढण्यास मदत करतात. त्यामुळं दाताच्या वेदनेपासून सुटका मिळतेय.


लिंबू


दाताच्या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाला मीठ लावून ते चावून खा त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करा. असं केल्याने दातदुखीवर आराम मिळतो. 


व्हीटग्रास 


व्हिटग्रासमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. अशावेळी जिथे दातदुखी होत आहे त्या भागावर व्हिटग्रासची पेस्ट लावल्याने आराम मिळतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)