नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील हे `5` पदार्थ; तुमच्या किचनमध्येच आहे उपाय
How To Lower Bad Cholesterol In Blood: रक्तातील कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
How To Lower Bad Cholesterol In Blood: हृदयविकाराचा झटका आणि त्यामुळं होणारे मृत्यू हा भारतातील चिंताजनक विषय ठरला आहे. हृदयविकार टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली असावी, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. जंक फुड, स्ट्रेस आणि मद्यपान या सारख्या सवयींमुळं हृदयविकाराचा धोका आणखी वाढतो. नसांमध्ये साचलेले वाईट कोलेस्ट्रॉल हे मुख्य कारण आहे. जेव्हा रक्तात प्लाक साचत तेव्हा ते आपल्या नसांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळं ब्लॉकेज होतात. अशा परिस्थितीत रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त अडथळा येतो. याला हाय ब्लड प्रेशर असं म्हणतात.
कोलेस्ट्रॉलमुळं कोरोनरी आर्टरी डिजीज. ट्रिपल वेसल डिजीज, हृदय विकार, हार्ट फेल्युअर, ब्रेन स्टोक आणि मधुमेहाचा धोका वाढतो. अशावेळी नसांमध्ये साचलेले बॅड कोलेस्ट्रॉल कसं कमी करता येईल, हे जाणून घेऊया. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरातीलच काही पदार्थ फार उपयुक्त ठरु शकतात.
कोलेस्ट्रॉल कमी करणारे पदार्थ
1 बडिशोप
बडिशोपचा वापर आपण साधारणतः जेवल्यानंतर माउथ फ्रेशनर म्हणून करतो. मात्र अनेक जणांना हे माहिती नाहीये की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही ही खूप फायदेशीर आहे. रात्री एक ग्लास पाण्यात बडिशोप भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्या.
आले
आलं आपल्या शरीरातील पाचनसंस्था सुरळीत करते. तुम्ही कच्च किंवा हर्बल टी म्हणूनची त्याचे सेवन करु शकता. यात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात जे नसांमधील साचलेले बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते.
लसूण
लसूणाचा गंध अनेकांना आवडत नाही मात्र कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करता येतो. रोज तुम्हाला लसणाच्या 2-3 पाकळ्या खाल्ल्या पाहिजेत किंवा लसूणाचा वापर भाजीत जास्तीत जास्त केला पाहिजे.
हळद
हळदीचा वापर तुम्ही जेवणात करताच पण तुम्हाला माहितीये का कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील हळद खूप फायदेशीर आहे. दुधाच्या गायीत चिमुटभर हळद टाकून ते दूध प्या.
आवळा
आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडेंट असतं. ज्याच्या मदतीने कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करता येऊ शकते. त्यासाठी दररोज 2 आवळ्यांचे सेवन केलेच पाहिजे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)