Water Chestnut Flour Benefits: वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे सलाड, फ्रुट, न्युट्रिशियनचे सल्ले हे सगळे उपाय करुनही वजन तसूभरही कमी झालं नाही. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का. वजन कमी करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे व्यायाम. पण आजच्या धकाधकीच्या काळात व्यायामाला वेळच उरत नाही. व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्याइतका वेळच नसतो. अशावेळी काही असे पदार्थ आहेत ज्यामुळं तुमचं वजन नियंत्रणात राहिल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोजच आपण जेवणात गव्हाच्या पीठाची पोळी किंवा ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी केली जाते. मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात तुम्हा शिंगाड्याचे पीठ वापरु शकता. शिंगाडा हा चवीला खूप छान आहे. हे फळ पाण्यात पिकवले जाते. त्यामुळं काही जण पाण्याचे फळ असंही म्हणतात. शिंगाड्यात अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. यात वजन नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्मदेखील असतात. त्यामुळं अनेक हेल्थ एक्सपर्ट आहारात शिंगाड्याचे पीठ वापरण्याचा सल्ला देतात. 


नवरात्रीचे व्रत असताना अनेकजण शिंगाड्याच्या पीठापासून बनवलेले पदार्थ खातात. कारण यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट आणि प्रोटिन आढळते. शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुण आढळतात. त्यामुळं अनेक आजारांपासून बचाव होतो. 


शिंगाड्याचे पीठ कसे खाल्ले जाते?


जर तुम्ही झपाट्याने वजन कमी करु इच्छिता तर शिंगाड्याच्या पीठाचा अनेक पद्धतीने वापर करु शकता. यात चपात्या, ढोकळा, भजी यासारखे अनेक पदार्थ करु शकता. हेल्थ एक्सपर्ट नाश्तात शिंगाड्याचे पीठ वापरण्याचा सल्ला देतात. कारण त्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही आणि तुम्हालाही जास्त जेवण जात नाही. म्हणजेच थेट जेवणाच्या वेळीसच तुम्हाला भुक लागेल. 


शिंगाड्याच्या पीठाचे फायदे


- ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी रोजच्या आहारात शिंगाड्याच्या पीठाचा वापर केला पाहिजे. कारण यात व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि आयोडिनसारखे तत्वे आढळले जातात. 


- नाश्तात तुम्ही शिंगाड्याच्या पीठापासून बनवलेले चपाती खाल्ली तर दिवसभर तुमचे पोट भरलेसारखे वाटेल आणि शरीराला एनर्जीदेखील मिळेल. 


- शिंगाड्यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्याचबरोबर यात सोडियम खूप कमी असते. त्यामुळं ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)