Health News :  एक काळ असा होता की केस पांढरे होणं हे वृद्धत्वाचं लक्षण मानलं जायचं, पण आता पांढऱ्या केसांचा वयाशी काहीही संबंध नाही. आता लहान मुलं आणि तरूणांचेही केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेकवेळा पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी डाय लावतात मात्र याने तुमचं आणखी नुकसान होऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर कोणत्या गोष्टींमुळे केस पांढरे होतात ते आपण पाहणार आहोत. आपल्या काही वाईट सवयी याला कारणीभूत आहेत. 


तरुण वयात तेलकट, फास्ट आणि जंक फूड खाण्याची खूप इच्छा होते. मात्र, ते तुम्हाला ते खाणं कितीही चविष्ट वाटत असलं तरी ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. ते आपल्या आतडे, किडनी आणि लिवरचं नुकसान करतंच त्यासोबतच केसांच्या पोषणावरही वाईट परिणाम होतो. जर तुमचे पोट हेल्दी नसेल तर केसांवर वाईट परिणाम होणार हे नक्की. त्याऐवजी प्रोटीन, विटामिन,  कैल्शियम, झिंक, आयरन और कॉपर अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. 


'चिंता ही चितेसारखी असते' असं आपल्या घरातील मोठं लोकं बोलतात. जर तुम्ही नेहमी तणावाखाली असाल तर शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतो. यामध्ये आपल्या केसांचाही समावेश होतो. तुम्ही आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि अनावश्यक टेन्शन घेऊ नका. तुम्ही मेडिटेशनच्या मदतीने नैराश्यावर मात करू शकता ज्याने तुमचे केस पुन्हा पांढरे होणार नाहीत.


सिगारेट आणि दारू आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. आपले रक्ताभिसरण नीट होत नाही, त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. म्हणून जितक्या लवकर तुम्ही धूम्रपान आणि मद्यपान सोडाल तितके चांगलं राहील. 


जर तुम्ही नियमित व्यायाम केला नाही तर रक्ताभिसरण मंद होऊन केसांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाही. त्यामुळे नेहमी वर्कआऊटकडे लक्ष द्या, तुमचे केसही निरोगी राहतील आणि केसांनीही चमक येईल.