Health Tips : रक्तातील साखरेची पातळी वाढली असल्यास तुम्हाला आरोग्यासंबधित बऱ्याच समस्या निर्माण होऊ शकतात.  रक्तातील साखरेची उच्च पातळी तुमच्या मूत्रपिंड (kidney), हृदय (heart) आणि इतर अवयवांवर परिणाम करू शकते. असं होऊ न देण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वैद्यकीय तपासणी, संतुलित आहार, व्यायाम नियमित असल्यास तुम्हाला मधुमेह (Diabetes) हा आजार होण्याची शक्यता कमी असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुमेह असणाऱ्यांनी आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नये. किंबहुना मधुमेह टाळायचा असेल किंवा तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू पाहणारे मधुमेही असाल, तर हे 5 खाद्यपदार्थ तुम्ही आहारात घेतल्यास अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. (Health Tips These simple remedies will reduce your blood sugar level too nz)


आणखी वाचा - Heart Attach: हार्ट अटॅक आल्यास तुम्ही सुद्धा वाचवू शकता जीव, फक्त करा ही दोन कामं


1. आळशी (Chia and flax seeds)


ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी चिया सीड्स आणि आळशी अर्थात फ्लेक्स सीड्स परिणामकारक काम करू शकतात. फायबर अर्थात तंतूमय घटकांनी परिपूर्ण असणारे आणि पचण्यास सोपी असणारी कर्बोदके या बियांमध्ये असतात, शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी त्या प्रभावी असतात. 


2. ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
ऍपल सायडर व्हिनेगर (ACV) हे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील ओळखले जाते. रिपोर्टनुसार, ACV इंसुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते.


3. शेंगदाणे आणि नट बटर (Nuts and nut butter)
बदाम, शेंगदाणे आणि नट बटरमुळं रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत होते. टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांना मदत करण्यात ते फायद्याचे ठरतात. नट्समध्ये Fiber असल्यामुळे त्याचे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात.  


unwanted pregnancy: असुरक्षित गर्भपात जीवावर बेतू शकतो, त्यामुळे आधीच करा असं प्लॅनिंग


4. अंडी (Eggs)


अंडी खाल्ल्यामुळं मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. अंड्यांमध्ये असणारे घटक शरीराला गरजेच्या असणाऱ्या स्निग्ध पदार्थांचा पुरवठा करतात. अंडी इंसुलिनची संवेदनशीलता सुधारतात आणि जळजळ कमी करतात. 


5. बीन्स आणि मसूर (Beans and lentils)
मसूर आणि बीन्समध्ये प्रतिरोधक स्टार्च आणि फायबर असतात. ते पचन प्रक्रिया मंद करतात आणि यामुळे रक्तातील साखरेची पातळी मर्यादित ठेवतात. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)