Empty Stomach Breakfast What To Eat What To Avoid: योग्य आहार हा उत्तम आरोग्यासाठी फार महत्त्वाचा असतो. त्यामुळेच कोणती गोष्ट कधी खावी याचे काही अलिखित नियम आहेत. हे नियम पाळल्यास जे पदार्थ आपण खातो त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या शरीराला होतो. मात्र आरोग्यविषयक जाणकार काही पदार्थ आवर्जून रिकाम्या पोटी खाणं टाळलं पाहिजे असं सांगतात. या लेखामध्ये आपण सकाळी नाश्त्याला (Breakfast) रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याबद्दल जाणून घेणार आहोत. कोणते पदार्थ खावेत याचबरोबर कोणते खाऊ नयेत हे सुद्धा तितकेचं महत्वाचे असते. त्यामुळे आपण दोन्ही गोष्टी जाणून घेणार आहोत.


सामान्यपणे हे पदार्थ टाळावेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीरामधील आम्लाचे प्रमाण वाढवणारे म्हणजेच अॅसिडीक पदार्थ रिकाम्या पोटी खाणं टाळावं. रिकाम्या पोटी असे पदार्थ खाल्ल्यास आतड्यांवर ताण पडतो. अशा पदार्थांमुळे आतड्यांना आतील बाजूने संसर्ग होण्याचाही धोका अधिक असतो. दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडामधील जीआयएमएस रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या डायटेशियन आयुषी यादव यांनी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय नाही याबद्दल काय सांगितले आहेत ते जाणून घेऊयात. कोणते पदार्थ खावेत, ते खाल्ल्याने काय फायदा होतो याचबरोबर काय खाऊ नये आणि त्याचा तोटा काय असतो हे आयुषी यांनी सविस्तरपणे समजावून सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात याचबद्दल...


रिकाम्यापोटी या गोष्टी खा...


1) अंडी (Eggs)


अंडी ही प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. सकाळचा अगदी उत्तम नाश्ता म्हणून अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अंड्याचं सेवन केल्यास दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं. तसेच दिवसभर तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा कायम राहते.


2) पपई (Papaya)


पपई एक सुपर फूड आहे. प्रत्येक ऋतूमध्ये मिळणारं हे फळ तुम्ही आवर्जून नाश्त्यामध्ये खावू शकता. पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.


3) भिजवलेले बदाम (Soaked Almonds)


सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चार भिजवलेले बदाम खाणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. यामुळे शरिराला बरेच फायदे होतात. फायबर, ओमेगा-थ्री, ओमेगा-सिक्सचा उत्तम स्त्रोत म्हणून बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. रात्रभर भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खावेत. हे बदाम खाताना त्याची सालं काढून खाणं अधिक फायद्याचं ठरतं.


4) ओट्स (Oats)


तुम्ही कॅलरी आणि हाय न्युट्रिएंट फूड खाण्याचा विचार करत असाल तर ओट्स एक उत्तम नाश्ता आहे. यामुळे वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.


रिकाम्या पोटी कधीच खाऊ नका या गोष्टी


1) टोमॅटो (Tomato)


कच्चं टोमॅटो खाण्याचे अनेक फायदा असतात. मात्र रिकाम्या पोटी टोमॅटो खाणं फार नुकसानकारक ठरु शकतं. टोमॅटोमध्ये असलेले अॅसिडिक गुणधर्म पोटात असलेल्या गॅस्ट्रोइंटस्टाइन अॅसिडबरोबर प्रक्रिया करुन अशापद्धतीच्या जेलची निर्मिती करतात ज्यामुळे पोटदुखी होते. त्यामुळेच सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो खाऊ नये.


2) दही (Dahi)


दही तसं तर आरोग्यासाठी फार फायदाचं असतं. मात्र रिकाम्या पोटी दही खाऊ नये. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. यामुळे सकाळी सकाळी दही खाल्ल्याने त्याचा शरीराला फारसा फायदा होत नाही.


3) सोडा (Soda)


सोड्यामध्ये मोठ्याप्रमाणात कार्बोर्नेट अॅसिड असतं. जेव्हा हे अॅसिड पोटातील अॅसिडबरोबर एकत्र येतं तेव्हा पोटदुखीची समस्या निर्माण होते. त्यामुळेच रिकाम्या पोटी सोडा पिऊ नये.


(Disclaimer: वर दिलेली माहिती ही घरगुती उपाय आणि सामान्य महितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. या उपायांचा अवलंब करण्याआधी तुमच्या फॅमेली डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.  ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)