Vomiting Problem During Traveling: सध्या तुम्हीही कुठलातरी ट्रॅव्हल प्लॅन (Motion Sickness While Traveling) करत असाल ना? परंतु घराबाहेर पडल्यावर प्रवास करताना मनोमनी एक भिती तुमच्या मनात खदखदत असेल ती म्हणजे प्रवासात बस, गाडी लागली तर काय करायचे? आपण आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला (Home Remedies for Motion Sickness) यासाठी अनेक रामबाण उपाय विचारतो आणि तऱ्हेतऱ्हेचे उपाय करतोही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व उपाय करूनही गाडी अथवा बस लागली तर अनेकजण अशावेळी खूप पॅनिक होतात परंतु तुम्हाला अशावेळी पॅनिक होण्याची गरज नाही. तुम्ही हा त्रास अगदी घरगुती उपाय वापरूनही निपटवू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही अशावेळी कोणते सोप्पे घरगुती उपाय करू शकता? 


मुळात प्रवास करताना आपण काय खातो याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा आपल्या खाण्यापिण्यात नको त्या गोष्टी जातात आणि त्यामुळे आपल्याला प्रवासात उलटी येते. त्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि त्यातून पुन्हा उलटीचा त्रासही (Vomiting Problem) वाढू शकतो. अशावेळी पोटात हलक जेवण जे पचायला योग्य असेल असे जेवण खाणं महत्त्वाचं आहे.


जंक फूड किंवा पोटाला जड असणारे पदार्थ तुम्ही खाल्लेत तर प्रवास करताना पोटात अन्न ढवळलं जाऊन त्याचा त्रासही होऊ शकतो. काहींना उलटीचा त्रास असेल तर काहींना प्रवासात शौचालयालाही सारखी सारखी लागू शकते. (health trending news know the home remedies for motion sickness during traveling in marathi)


तुम्हाल मोशन सिकनेसचा त्रास आहे का? 


आपल्यापैंकी अनेकांना मोशन सिकनेसचा त्रास असतो. लॉन्ग ड्राईव्हसाठी जायला निघालो की वाटेत उलटी तर होणार नाही ना याचीही काळजी अनेकांना लागून राहिलेली असते त्यामुळे अशावेळी तुमचा मूड खराबही होतो. बऱ्याचदा अनेक लोकांना घाटातून प्रवास करताना मोशन सिकनेसचा त्रास होतो. त्यामुळे घाट आला की आला त्यांच्या पोटात आधीच गोळा येयला लागतो. परंतु अशावेळी घाबरू नका. 


हेही वाचा - Chocolate Hero पेक्षा कमी नाही 'हा' अभिनेता; तरूणवयातील फोटो पाहून सलमान, शाहरूखही पडतील फिके


'हे' करा घरगुती उपाय


  • लिंबू - तुम्ही प्रवासात जाताना लिंबूचे काम सोबत ठेवा. तुम्हाला असं वाटतं असेल तर तुम्हाला उल्टीचा त्रास होतो आहे. तर मग लिंबूच्या फोडीचा वास घ्या. या वासानं तुम्हाला उलटीचा त्रास होणार नाही. 

  • आलं - आल्याचे तुकडेही तुम्ही प्रवासात सोबत ठेवू शकता. लिंबूप्रमाणे त्याचेही काप करा आणि ते तुम्हाला असं वाटलं की उलटीचा त्रास होऊ शकतो तर आल्याचे तुकडे चाखू शकता. 

  • लवंग - लवंगासोबतच तुम्हाला काळं मिठं, साखर पावडर टाकून त्यांच्या मिश्रणाचे सेवन करू शकता. 

  • अजवाइन - अजवाइन, पुदिना, कापूर असे मिश्रण घेऊ ते उन्हात ठेवा आणि त्यानंतर याचे मिश्रण एका बाटलीत घ्या आणि त्याचा ज्यूस करा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)