Right Time to Eat Egg: अंडी खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीये का?
Right Time To Eat Egg: अंडी खाण्याचेही प्रचंड फायदे आहेत. परंतु अंडी खाण्याची (Eating Eggs) योग्य वेळ कोणती तुम्हाला माहिती आहे का? अंडी तुम्ही या गोष्टींनंतर खाऊ शकता. ज्याचा फायदा (Eggs Health Tips) तुमच्या आरोग्यासाठीही होऊ शकतो.
Right Time To Eat Egg: आपण अनेकदा नाश्त्यामध्ये अंडी खाण्याला प्राधान्य देतो. त्यातून अंडी खाणं (Right Time to eat eggs for weight loss) हे आपल्या शरीरासाठी चांगलेही असते. अंड्यांमध्येही अनेक पोषक घटक असतात. आपल्या उकडलेली अंडी खायला आवडतात त्याचबरोबर आपण ऑम्लेट (right time to eat eggs in a day) नाहीतर हाफ फ्राय खातो. परंतु अंड्यांच्या आरोग्यदायी फायद्यांसोबतच तुम्हाला माहितीये का की अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती आहे ते? आपण जास्तीकरून अंडी ही सकाळीच नाश्त्याला खातो.परंतु अंडी खातानाही आपल्याला योग्य वेळ पाळणे आवश्यक असते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती?
अंड्यांच्या बाबतीत आपण कायमच असं ऐकत आलोय की सोमवार असो वा रविवार, रोज अंडी खावीत... म्हणजेच संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही जाहिरातही अनेकदा पाहिली असेलच. परंतु तुम्हाला माहितीये का की अंडी खाण्याची योग्य वेळ असते आणि ती जरा तुम्ही पाळलीत तर तुम्ही तुम्हाला त्याचा आरोग्यदायी फायदाही होऊ शकतो. आपल्या शरीरासाठी अंड्यांचे (Eggs Health Benefits) अनेक फायदे आहेत. अनेकांचे असे मतं असते की अंड्यांतील पिवळ्या बलकामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. (health trending news know the right time of eating eggs)
अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती?
ब्रेकफास्टमध्ये - ब्रेकफास्टमध्येही तुम्ही अंडी खाऊ शकता. अंडी जर का तुम्ही ब्रेकफास्टला खाल्लीत (Eggs in Breakfast) तर मॅग्नेशियम, झिंक, आयरन आणि प्रोटीनसारखे अनेक पोषक तत्त्वे मिळतात. तुम्ही हेवी ब्रेकफास्ट केालत तर जास्त वेळेसाठी तुम्हाला भुक लागत नाही. अनेकांच्या पोटातून भुक लागली असेल किंवा पोटभर जेवण झालं नसेल तर आवाज येऊ लागतो तेव्हा अशावेळी पोटभर किंवा योग्य तो ब्रेकफास्ट करणं गरजेचे आहे.
वर्कआऊटनंतर - तुम्ही वर्कआऊटनंतर अंड्याचे सेवन करू शकता. कारण वर्कआऊटनंतर तुमची एनर्जी (Eggs after Workout) कमी होते आणि त्यानंतर तुम्हाला फार जोरात भूक लागते. तेव्हा अशावेळी तुम्ही अंडी खाऊ शकता. तुमच्या मांसपेशींसाठी अंडी ही खूप फायदेशीर असतात. तुम्ही ऑम्लेट किंवा उकडलेली अंडीही खाऊ शकतात.
रात्री डिनरनंतर - रात्री शांत झोप येण्यासाठी तुम्ही रात्रीही अंडी (Can we eat eggs at night) खाऊ शकता.
अंड्यांमध्ये कोणते गुणधर्म असतात?
अंड्यांमध्ये अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन आणि प्रोटीन्स हे मुबलक (Amino acid in eggs) प्रमाणात असतात. याचा फायदा तुमच्या मांसपेशींसाठीही चांगला होतो. त्यातून अंड्यांतून कोलीन हे द्रवपदार्थ मिळतो जे आपल्या मेंटल हेल्थसाठी अत्यंत आवश्यक असते.
कोणते व्हिटॅमिन्स मिळतात?
अंड्यातून तुम्हाला व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असे भरपूर व्हिटॅनिम्स असतात. त्याचबरोबर यामध्ये एन्टी (Vitamins in eggs) ऑक्सिडंट्सही असतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)