मुंबई : दिवसेंदिवस डेंग्यू हा आजार डोकं वर काढताना दिसत आहे. वातावरणातील बदलांमुळे साथीचे रोग पसरत आहेत. रक्त पिणाऱ्या या मच्छरपासून वाचण्याकरता अनेक प्रयत्न केले जातात.  जर डेंग्यूची लागण ही सुरूवातीलाच कळली तर डाएट फॉलो करून डेंग्यू घालवू शकतात. डेंग्यूच्या रूग्णांनी पाण्यात लगेच उकळतील अशाच पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. त्यामुळे डेंग्यूच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, सूप, फळ ज्यामध्ये केळ आणि सफरचंद घ्यायला हवां.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोटीनयुक्त पदार्थांचा वापर 
डेंग्यू झाल्यावर रूग्णाने प्रोटीनने भरलेले पदार्थ अधिक खावेत. त्यांनी आपल्या आहारात अंड्याचा समावेश आपल्या जेवणात करावा. प्रोटीनयुक्त आहारात दूध, डेअरीच्या पदार्थांचे सेवन करावे. 


हर्बल टी 
डेंग्यूमध्ये आलेल्या अशक्तपणातून लवकर बाहेर पडण्यासाठी चहा किंवा कॉफी न घेता हर्बल टीचं सेवन करा. तुम्हाला वाटल्यास त्यामध्ये तुम्ही अद्रक किंवा वेलचा वापर करू शकता. हर्बल टीमुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल. 


पाणी 
डेंग्यूची लागण झाल्यावर अधिक प्रमाणात पाणी प्यावे. पाणी प्यायला त्रास होईल पण पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच ओआरएस पावड देखील पाण्यातून प्यायलास त्याचा फायदा होईल. यामुळे डिहायड्रेशन होत नाही. 


नारळ पाणी 
डेंग्यूमधील व्हायरलमध्ये सर्वात अगोदर तुमच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्स नियंत्रित ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यावे. इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनरल्स प्यायलाने शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक राहते.