नवी दिल्ली : सर्वजण नव वर्षाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. अनेकांनी तर नवीन संकल्प देखील केले असतील. नव वर्षासाठी काही गोष्टी योजल्या असतील. त्यात कदाचित स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली हा मुख्य उद्देश असेल. कारण आरोग्य चांगले असले तरच आपण आनंदी राहू शकतो, भरपूर काम करू शकतो आणि जगण्यातील आनंद घेऊ शकतो.


नियमित व्यायाम करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वतःला व्यायाम करायची सवय लावून घ्या. दररोज ४० मिनीटे तरी आर्वजून व्यायाम करा. व्यायामाला तुमच्या दिनचर्येत प्राधान्य द्या. योगसाधना, जीम, इतर व्यायाम प्रकार काहीही तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता. किंवा नाचातून तुम्ही तुमचा फीटनेस राखू शकता. 


पुरेशी झोप घ्या


झोपेमुळे शरीर-मनाला आराम मिळून त्यांना नवी ऊर्जा मिळते. हृदय आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. या उलट सातत्याने अपुरी झोप मिळत असल्यास आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. त्याचबरोबर अपूऱ्या झोपेमुळे रक्तदाब, मधूमेह आणि स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका वाढतो.


लक्ष्य गाठा


यंदाच्या नववर्षात समस्यांवर सोडवण्यापेक्षा तुमचे उद्दीष्ट साध्य करण्यावर भर द्या. तुमचे काम तुम्हाला आनंद, उत्साह देईल. 


भरपूर पाणी प्या


आजारांपासून आणि डॉक्टरांपासून दूर राहायचे असल्यास दररोज ८ ग्लास पाणी प्या. त्यामुळे तुमची शारीरिक कार्य सुरळीत चालतील. त्याचबरोबर वजन कमी करण्यास, पचन चांगले होण्यास आणि त्वचा व केसा सुंदर होण्यास मदत होते.