स्वयंपाकघरातील `हे` आरोग्यवर्धक पदार्थही ठरू शकतात घातक
भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी आणि आरोग्यवर्धक गुणधर्म असतात.
मुंबई : भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी आणि आरोग्यवर्धक गुणधर्म असतात. त्यामुळे अशाप्रकारे मसाले केवळ आहाराचा स्वाद वाढवत नाहीत तर आरोग्यालाही अनेक फायदे देतात. मात्र आरोग्यवर्धक आहेत म्हणून निष्काळजीपणे त्याचा आहारात समावेश करणं किंवा वापर करणे नुकसानकारक आहे. म्हणूनच हे पदार्थ वापरताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे.
कोणते पदार्थ सांभाळून वापरणं गरजेचे ?
बदाम -
बदामाचे अअरोग्यदायी फायदे तुम्हांला ठाऊक असतील पण महिनों महिने स्वयंपाकघरात पडलेले बदाम किंवा कडवट झालेले बदाम आरोग्याला धोकादायक आहेत. बदमांमध्ये हायड्रोजन साईनाईड्चं प्रमाण वाढल्यास ते कडवट होतात. अशा बदामांचा आहारात समावेश करणं आरोग्याला धोकादायक आहेत.
बटाटा -
झटपट बनणारी आणि अनेकांच्या आवडीची भाजी बटाट्याची भाजी. मात्र खूप दिवस बटाटे घरात पडून राहिले असतील तर हळूहळू त्याला कोंब येतात. मात्र अंकुरित बटाट्याचा आहारात समावेश करणं धोकादायक आहे.
मध -
शुद्ध मध मिळावं म्हणून तुम्ही थेट मधूमक्षिका पालन करणार्या केंद्रातून मध विकत घेत असल्यास थोडी काळजी घ्या. कारण अशाप्रकारे मध वापरणं काही लोकांसाठी त्रासदायक ठरते. मधातील लहान लहाव जीव आरोग्याला त्रासदायक आहे. अशा मधामुळे उलटी होणं, चक्कर येणं असा त्रास होऊ शकतो.
फळांच्या बीया
सफरचंद, चेरी. नाशपाती, पीच या फळांच्या बीयांमध्ये हायड्रोजन साईनाईडचं प्रमाण अधिक असतं. याला प्रोसियिक अॅसिडही म्हणतात. या फळांच्या बीया खाणं कटाक्षाने टाळा. त्याचा आरोग्याला त्रास होऊ शकतो.
जायफळ
जायफळाची पावडर गोडाच्या पदार्थांची चव वाढवण्यापासून जुलाब थांबवण्यासाठी, झोप येण्यासाठीही वापरले जाते. आयुर्वेदामध्येही त्याचं महत्त्व अधिक आहे. जायफळ अधिक प्रमाणात आहारत घेतल्यास हार्ट अटॅक, नसा कमजोर होणं, मन अस्वस्थ होणं, हायपोथमिया अशा अनेक समस्यांचा त्रास बळावतो.