Hearing loss: एक किंवा दोन्ही कानांमधून अर्धवट किंवा पूर्णपणे आवाज ऐकू येत नसला तर या स्थितीला हिअरिंग लॉस किंवा बहिरेपणा असं म्हणतात. कानाच्या बाबतीत उद्भवणारी मुख्य समस्या म्हणजे श्रवणशक्ती कमी होणं. ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एका कानाने किंवा दोन्ही कानाने अंशत: किंवा पूर्णपणे ऐकू येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हळूहळू ही समस्या वाढू लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईच्या रूग्णालयातील सल्लागार ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉ राजेंद्र वाघेला यांच्या सांगण्यानुसार, श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे लोकांच्या जीवनमानावर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा व्यक्तींना दैनंदिन कामकाजात संभाषण समजण्यात अडचण येते. चांगला आवाज येतो परंतु एखादी गोष्ट समजण्यास त्रास होतो आणि त्यामुळे एखादं वाक्य पुन्हा-पुन्हा बोलण्याची विनंती करावी लागते. 


यामागे कोणती कारणं आहेत


श्रवण क्षमता कमी होणे किंवा जन्मतः श्रवण शक्ती कमी असू शकते किंवा भविष्यात ही समस्या विकसित होऊ शकते, कोणत्याही वयोगटातील लोकांना ही समस्या प्रभावित करते.
 
श्रवणशक्ती कमी असलेल्या लोकांना त्यांच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यामुळे कामाच्या ठिकाणी देखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कारण त्यांना सूचना ऐकण्यास किंवा संभाषणांमध्ये प्रभावीपणे सहभागी होण्यास त्रास होऊ शकतो. मुलांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याचे परिणाम विशेषतः चिंताजनक आहेत कारण ते त्यांच्या भाषा आत्मसात करण्याच्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अडथळा निर्माण करु शकतात. 


प्रौढांमध्ये ते विविध अडथळे निर्माण करतात जे त्यांचे करिअर आणि वैयक्तिक संबंध या दोन्हींमध्ये व्यत्यय आणू शकतात. याचा परिणाम नोकरीच्या कामगिरीवर आणि करिअरच्या प्रगतीवर होऊ शकतो. शिवाय, श्रवणशक्ती कमी होण्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे चिंता आणि नैराश्याच्या भावना निर्माण होतात.
 
जीवनाच्या सुधारित गुणवत्तेसाठी श्रवणसक्ती कमी झाल्याचे वेळीच निदान करणे महत्वाचे आहे. वेळाच निदान झाल्याने योग उपचार करता येणे शक्य असते जेणेकरुन श्रवण क्षमता गमावण्याचा धोका राहत नाही. गंभीर श्रवणदोषाचा सामना करणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी श्रवणयंत्र, कॉक्लियर इम्प्लांट आणि थेरपी यांसारखे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध आहेत. Otoacoustic Emissions (OAE), ऑडिओमेट्री, ऑडीटरी ब्रेनस्टेम रिस्पॉन्स (ABR), आणि हाय-रिझोल्यूशन इमेजिंग (CT MRI) यासारख्या साधनांचा वापर करुन अचूक निदान करणे शक्य असते.


श्रवणशक्ती कमी होणे


श्रवणशक्ती कमी होण्याची गुंतागुंत ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. कॉक्लियर इम्प्लांट, श्रवण यंत्र आणि समुपदेशन यांसारखे पर्याय रुग्णांना योग्य ठरतात. प्रत्येकाने त्यांच्या श्रवण क्षमतेकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांना श्रवणविषयक समस्या असल्यास त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी.