High Cholesterol : आजकाल अनेकांची लाईफस्टाईल ही अनहेल्दी झालीये. चुकीची लाईफस्टाईल आणि अयोग्य आहारामुळे हाय कोलेस्ट्रॉलची ( High Cholesterol) समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. अधिक फॅटयुक्त आहार घेणं, व्यायाम न करणं, तर स्मोकिंग आणि ड्रिंकीगमुळे कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात वाढ होते. मुख्य म्हणजे सुरुवातीला याची कोणंतीही लक्षणं दिसून येत नाहीत मात्र हा त्रास वाढल्यास एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तुम्हाला माहितीये का तुमचा आहार आणि लाईफस्टाईलकडे लक्ष देऊन शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलच वाढतं प्रमाण रोखलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर जीवनशैली बदलली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जवस रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कशा प्रकारे कमी करू शकतं.


अमेरिकन सोसायटी फॉर न्यूट्रिशनने यासंदर्भात 2015 मध्ये अभ्यास केला होता. जवसाच्या बियांचं सेवन केल्याने शरीरातील वाढणारं कोलेस्ट्रॉल कमी होतं. या संशोधनात टीमला हृदयाच्या संबंधीत रुग्णांमध्ये फ्लॅक्ससीडमुळे खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 15 टक्के कमी झाल्याचं समजलं.


फ्लॅक्ससीडमुळे कसं होतं कोलेस्ट्रॉल कमी?


जुन्या काळापासून लोकं त्यांच्या आहारात जवसाचा वापर करतायत. शिवाय जवसाच्या तेलाचाही वापर केला जातो. फ्लॅक्ससीडमध्ये ओमेगा 3 तसंच ओमेगा 6 फॅटी अॅसिड, सॉल्यूबल फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं. या सर्व गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.


फ्लॅक्ससीडचं सेवन कसं करावं?


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात एक चमचा जवसाचा वापर केला जावा. फ्लॅक्ससीड कधीही कच्चं खाऊ नये. ड्रायफ्रूट्ससोबत तुम्ही फ्लॅक्ससीड भाजून खाऊ शकता. फ्लॅक्ससीड भाजून, बारीक करून, स्मूदीमध्ये, हलवा, लाडूमध्ये आणि दह्यामध्ये मिसळूनही खाता येतं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीच्या प्रमाणात फ्लॅक्ससीडचं सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.