मोठी बातमी!!! heart attackपासून बचाव शक्य, फक्त ही फळं खा
हृदयविकाराचा धोका असणाऱ्यांनी काही फळे जरूर खावीत, ज्यामुळे तुमची कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहते.
मुंबईः हृदयरोगींना एकदा अटॅक आल्यानंतर पुन्हा येऊ नये, म्हणून त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. यामुळेच आहारात फळे आणि भाज्यांच्या सेवनाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे अटॅकचा धोका कमी होतो आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.
ज्या लोकांना आधीच हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांनी त्यांच्या आहारात नियमितपणे बेरीचा समावेश करावा. याच्या सेवनाने हृदय सुरक्षित राहते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट तणाव कमी करतात.
याशिवाय रासबेरी हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. लहान दिसणारे हे फळ जिभेवर ठेवताच सहज विरघळते. वास्तविक, ते खाल्ल्याने हृदयापर्यंत रक्त पोहोचणाऱ्या नसा तंदुरुस्त राहतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
हृदयासाठीही द्राक्षे खूप फायदेशीर आहेत. वास्तविक, द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल आणि फिनोलिक ऍसिड्सचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. या फळामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे हृदय निरोगी ठेवतात.
याशिवाय आहारात सफरचंदाचा समावेश करू शकतात. ते खाल्ल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. सफरचंद हा हृदयरोग्यांसाठी रामबाण औषध असल्याचं मानलं जातं. अशा लोकांना ज्यांना उच्च रक्तदाब किंवा हृदयात ब्लॉकेज सारख्या समस्या आहेत त्यांनी दररोज एक सफरचंद खावं.