`या` कारणांमुळे पुरूषांमध्ये वाढते हार्ट अटॅकची समस्या
भारतीय मूळ असलेल्या अगुवाई या शोधकर्त्यांना आपल्या शोधात धक्कादायक माहिती सापडली आहे.
न्यूयॉर्क : भारतीय मूळ असलेल्या अगुवाई या शोधकर्त्यांना आपल्या शोधात धक्कादायक माहिती सापडली आहे.
कार्डियोवस्कुलर रोगाचे शिकार बनलेल्या पुरूषांना सेक्सनंतर अचानक कार्डिएक अरेस्ट (हार्ट अटॅक) होण्याची दाट शक्यता असते. अचानक कार्डिएक अरेस्टमध्ये हृदयाचे धडकणे बंद होते. आणि हा प्रकार अगदी कोणतीही पूर्वसूचना न देता होते. या शोधातून अशी माहिती समोर आली आहे की, कार्डिएक अरेस्टच्या घटना फार दुर्लभ आहेत. मात्र यामध्ये जीवंत राहण्याची शक्यता फारच कमी आहे.
यामध्ये अशी गोष्ट लक्षात आली आहे की, पीडित व्यक्तीसोबत असणारी व्यक्ती सीपीआर देण्यास तयार नसते. कारण सीपीआर दिल्यामुळे अधिक लोकांचे प्राण वाचल्याचे निदर्शनास आले आहे. सेडर्स - सिनाई हार्ट इन्स्टिट्यूटचे असोसिएट निदेशक सुमीत चुघ यांनी सांगितले की, शारिरीक संबंधांच्यावेळी अशा पद्धतीने हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते.
हा शोध जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डियोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शारिरीक संबंधाच्या वेळी घेतलेले उत्तेजक पदार्थ यासाठी हानीकारक असल्याचे म्हटले आहे.