Health News : हृदय आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. प्रत्येकजण आता व्यस्त आणि धावपळीच्या जीवनामुळे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. देशामध्ये हृदयरूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यासाठी नक्की कोणती कारणे आहेत. आता प्रत्येकाचं त्याच्या खाण्यावर नियंत्रण राहिलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयविकाराची सुरुवात हाई कोलेस्ट्रॉलपासून होते त्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पुरवठा होण्यासाठी रक्तदाब वाढतो आणि उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागतो. असे कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे हृदयाला नुकसान होऊ शकतं. 


हृदयाच्या आरोग्यासाठी 'या' गोष्टी टाळा-
1. सिगारेट आणि अल्कोहोल
सिगारेट आणि दारूमुळे फुफ्फुस आणि यकृताची मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते असं म्हटलं जातं. मात्र याचा थेट परिणाम हा हृदयावरही होत असतो त्यामुळे हाय बीपी, हार्ट फेल्युअर हे आजार उद्भवू शकतात. अशा वाईट सवयी जितक्या लवकर सोडाल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. 


2. सॉफ्ट ड्रिंक्स
आपण अनेकदा फ्रेश होण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक्स घेत असतो. मात्र हे सॉफ्ट ड्रिंक्स आपल्या आरोग्यासाठी घातक असतात. त्यामध्ये सोड्याचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपल्याला हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.


3. तेलकट पदार्थ
भारतात अनेकजण खाद्यप्रेमी आहेत, चटकदार आणि चमचमीत पदार्थ आपण खात असतो. मात्र तेलकट पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत. तेलकट पदार्थांमुळे आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचं वाढतं आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवत असाल तर वेळीच सावध व्हा नाहीतर याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो.


4. प्रोसेस्ड मीट-
हल्ली प्रोसेस्ड मीटचा ट्रेंड खूप वाढला आहे. अनेकदा लोक प्रथिने मिळविण्याच्या इच्छेने मांस खातात, परंतु प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये मीठाचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकतं आणि ते हृदयविकाराच्या झटक्याचं कारण होऊ शकतं. 


जर अशा पदार्थांचं सेवन करत असाल तर आत्ताच सर्व टाळा आणि हृदय रोगापासून लांब राहा. तरुणांपासून ते अगदी म्हाताऱ्यांपर्यंत बरेच लोक या समस्येला बळी पडले आहेत. एवढंच काय तर मोठ-मोठे सेलिब्रिटी देखील त्यापासून वाचू शकले नाहीत.