Heart health : हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं ते शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असणं. त्यासाठी आहारात योग्य ती काळजी घेतली पाहिजे. हाय कोलेस्ट्रॉल (High cholesterol) मुळे हृदय विकाराचा धोका वाढतो. त्यामुळेच हार्ट अटॅक एक गंभीर आजार बनला आहे. WHO च्या माहितीनुसार, हार्ट अटॅक हे जागतिक स्तरावर मृत्यूचं प्रमुख कारण बनलं आहे. रक्त वाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीरात गुड आणि बॅड असे दोन कोलेस्ट्रॉल असतात. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फळे आणि भाज्या यांचा समावेश आहारात केला पाहिजे. जाणून घेऊया कोणती फळे आणि भाज्या चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. ज्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात (control cholesterol) आणू शकतो.


कोणती फळे खावीत


हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींना सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, त्यामुळे रोज एक सफरचंद खाणे आवश्यक आहे.


एवोकॅडोचाही आहारात समावेश करावा. कारण हे सुपरफूड तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते आणि आजारांना दूर ठेवते. ऍव्होकॅडोमध्ये फॅटी ऍसिडसह जीवनसत्त्वे ए, बी, ई, फायबर, खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.


Avocado मध्ये साखरेचे प्रमाण खूपच कमी असते आणि हे फळ ऊर्जेचा खूप चांगला स्त्रोत आहे. एवोकॅडो खाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते.


या भाज्यांचा आहारात समावेश करा


डाळी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. तुम्ही पाहिले असेलच की बहुतेक लोक जेव्हा हृदयाशी संबंधित समस्या असतात तेव्हा कडधान्य खातात. कारण ते खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.


तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही याचा फायदा होईल. कारण हिरव्या भाज्या खाल्ल्याने आजार दूर राहतात.


(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य समजुतींवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.)