Reasons Behind Tears While Laughing: आपल्याला अनेकदा आनंद होता होता आणि पुष्कळ हसता हसता आपल्या डोळ्यातून अचानकच पाणी येतं पण हे असं का होतं याचा आपल्याला काही पत्ताच लागत नाही. तेव्हा यामागचं कारण काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच. (here are the simple things to know why you cry when your happy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मानवी भावनांमध्ये हसणं किंवा रडणं या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जेव्हा मोकळेपणानं हसतो तेव्हा आपली टेंशन आणि स्ट्रेसमधूनही सुटका होते (Stress and Tension). त्यातून उलट भावना म्हणजे रडणं, रडल्यावर आपलं दुःख हलकं होतं आणि आपलं मनंही मोकळं होतं. पण या दोन भावना प्रकट करताना आपल्या अनेक वेगळ्या गोष्टींचाही अनुभव येतो आणि तो म्हणजे खूप रडल्यावर डोकं दुखणं, डोळं दुखणं त्याचबरोबर खुप हसल्यावर पोटात दुखणं किंवा डोळ्यातून पाणी येणं. 


आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय


या भावना व्यक्त करताना आपल्या अशा अनेक गोष्टींचा अनुभव येतो परंतु यातील सर्वात मजेशीर गोष्ट आहे ती म्हणजे आनंद झाल्यावरही आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की यामागचं नेमकं कारण काय आहे? (Why we tears when we are happy) 


  • असं म्हटलं जात की यामागे मुख्य भूमिका हार्मोन्सची असते. तज्ञांच्या मते मेंदूचा जो भाग हसण्यात सक्रिय असतो तो रडण्यातही सक्रिय असतो. सतत हसणे किंवा रडणे यांमुळे मेंदूच्या पेशींवर ताण वाढतो. अशा स्थितीत शरीरात कॉर्टिसॉल आणि एड्रेनालाईन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात. हे हार्मोन्स हसताना किंवा रडताना शरीरात उलट प्रतिक्रियांसाठी जबाबदार असतात.

  • मोकळेपणाने हसताना आपल्या चेहऱ्याच्या पेशी अनियंत्रितपणे काम करतात आणि म्हणून आपल्या डोळ्यातून अश्रु येतात. आपण जेव्हा मनमुराद हसतो तेव्हा याच पेशी आपल्या मेंदू तसा सिग्नल देतात आणि आपल्या डोळ्यात पाणी येतं. असंही मानलं जातं की जास्त हसल्यानं आपण भावूक होतो आणि भावूक झाल्यानं आपल्या चेहऱ्यांच्या पेशींवर अतिरिक्त दबाव पडतो ज्यामुळे आपल्या डोळ्यात अश्रु येतात ज्यानं आपला तणावही संतुलित राहतो. 

  • ही संपूर्ण प्रक्रिया व्यक्तीपरत्वे बदलू शकते. संबंधित व्यक्ती किती भावनिक आहे यावर ते अवलंबून असते. म्हणजेच कमी-अधिक रडण्याने ही क्रिया वेगवेगळ्या प्रकारे घडते. यासोबतच तो स्त्री असो की पुरुष यातही फरक पडतो. असे मानले जाते की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात, त्यामुळे महिलांसोबत हसताना त्यांना अश्रू फुटण्याची शक्यता असते. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)