मुंबई : सध्या सर्वत्र होळीचा आणि धुळवडीचा माहोल आहे. वाईटाचा चांगल्यावर विजय हेच या सणाचं प्रतीक. वाईट प्रवृत्तींचा नाश करत, दहन केलेल्या होळीत त्यांचा त्याग करणं हा यामागचा मुख्य हेतू. फक्त इतकाच नव्हे, तर धमाल- मजामस्ती... हासुद्धा असतो. (Holi 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होळीचा अविभाज्य भाग म्हणजे भांग. गुजिया, जिलबी , पापडा खायचा आणि भांग पिऊन बेभान व्हायचं असाच बेत तुमच्याआमच्यापेकी कितीजण आखत असतील. 


धुळवडीच्या दिवशी रंगात रंगून जात अनेकजण प्रमाणाहून जास्त भांग पितात. ज्यानंतर आपण नेमकं काय करतोय याचीही त्यांना शुद्ध नसते. 


भांगचा नशा उतरवण्यासाठी अनेक उपाय करुनही नशा उतरतच नाही, ज्यामुळं हीच भांग रंगाचा बेरंगही करुन जाते. 


पण, तुम्हाला माहितीये का भांगचा नशा उतरवण्यासाठी 1 रुपयापासून ते अगदी 5 रुपयापर्यंतचं वर्तमानपत्रही मोलाचं काम करतं. 


वर्तमानपत्र कसा उतरवणार भांगचा नशा? 


सर्वप्रथम एका ग्लासात पाणी घ्या. यानंतर त्यात वर्तमानपत्र बुडवा. नंतर वर्तमानपत्रानं काहीसं पाणी शोषून घेतल्यानंतर ते पाणी एखादं कापड पिळतो तसं पिळून घ्या. 


ही प्रक्रिया केल्यानंतर ग्लासात जमा झालेलं पिळलेलं पाणी ज्याला भांगचा नशा आहे, त्या व्यक्तीला प्यायला द्या.


नशा कितीही जास्त असो, ही शक्कल लढवल्यास नक्कीच भांगही त्यापुढे फिकी पडेल. 


सर्वांच्याच शरीरावर या मार्गाचा एकसारखाच परिणाम दिसेल असं नाही. अशा प्रकारचं पाणी प्यायल्यानंतर काहीही बदल दिसून आल्यास किंवा अनुचित प्रकार आढळल्या, डॉक्टरांची मदत घ्या. 


(वरील माहिती काही घरगुती उपायांपैकी एक आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )