मुंबई : प्रखर उन्हामुळे, घामाच्या चिकचिकीमुळे जीव नकोसा होतो. प्रखर उन्हामुळे सनटॅन, ब्राऊन स्पॉट्स आणि सनबर्न सारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्या दूर करण्यासाठी घरच्या घरी तुम्ही फेसपॅक बनवू शकता. हे फेसपॅक त्वचेच्या समस्या दूर करण्यास अत्यंत फायदेशीर ठरतील. तुम्हीही ट्राय करा करा हे फेसपॅक...


बेसन पॅक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेसनात थोडे पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. २० मिनिटांनी सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास सनटॅन, ब्राऊन स्पॉट्स आणि सनबर्न सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. कारण यामुळे मृत त्वचा दूर होते.


लिंबाचा रस


उन्हाने काळवंडलेल्या त्वचेसाठी हा परिणामकारक उपाय आहे. लिंबाचा रस हे नैसर्गिक ब्लीच आहे. बेसन आणि मधात लिंबाचा रस घालून टॅन झालेल्या त्वचेवर लावा. १०-१५ मिनिटे त्वचेवर लावा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.


नारळपाणी आणि चंदन


चंदनामध्ये त्वचा स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. तर नारळपाण्यामुळे त्वचा चमकदार होते. एक चमचा चंदन पावडरमध्ये थोडे नारळपाणी घालून घट्ट पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवा.


हळदीचे दूध


अर्धा कप दूधात चिमुटभर हळद घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि सुकू द्या. सनबर्नपासून संरक्षण म्हणून हा उपाय रोज करा.


पपई आणि मध


अर्धा कप पपईचे तुकडे मॅश करा त्यात मध घालून चेहऱ्याला लावा. ३० मिनिटांनी चेहरा धुवा. त्वचा मऊ-मुलायम होईल. मधामुळे त्वचा कोमल होते आणि पपईमुळे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.


काकडी आणि गुलाबपाणी


उन्हामुळे खराब झालेली त्वचा आणि घामोळ्यांपासून त्वचेला आराम देण्यासाठी काकडी-गुलाबपाण्याचा फेसपॅक उपयुक्त ठरतो. एक चमचा काकडीच्या रसात, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घाला. हे मिश्रण १० मिनिटे चेहऱ्याला लावा आणि नंतर चेहरा धुवा.