Home made herbal powder for tooth cavity : आजकाल अगदी लहान वयातच दात किडण्याची समस्या पाहायला मिळते. अशात तुम्ही घराच्या घरी, दातांसाठी खास हर्बल पावडर बनवू शकतात. या बातमीतून तुम्ही दातांच्या आणि हिरड्यांच्या काळजीसाठी कशी घरच्याघरीच उत्तम हर्बल पावडर बनवू शकता, हे जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दातांची योग्य प्रकारे देखभाल केली नाही तर दात किडू शकतात. यालाच टूथ कॅव्हिटी असं देखील म्हणतात. सध्या ही समस्या सर्वांमध्ये पाहायला मिळते. दातांना कीड लागल्यास दात काळे पडतात, दात पूर्णपणे सडू शकतात. कीड लागल्यानंतर दात आतून पोकळ देखील होतात, याचा तुम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो. अशात तुमचे दात काढून नवे दात बसवावे लागू शकतात. दात काढणं, नवीन दात बसवणं हे अत्यंत वेदनादायी असूच शकतं, सोबतच यामध्ये तुमचे पैसेही मोठ्या प्रमाणात खर्च होतात. चला तर मग जाणून घेऊयात दातांसाठी वरदान ठरणारी हर्बल पावडर बनवायची कशी? 


साहित्य : 


  • कडुलिंबाच्या पानांची पावडर 

  • दालचिनी पावडर 

  • लवंग पावडर 

  • मुळेथी पावडर 


कशी बनवाल दातांसाठीची हर्बल पावडर : 


वरील सर्व साहित्य सम प्रमाणात घ्या. सर्व साहित्य एकत्र नीट मिक्स करा आणि तुमची दातांसाठीची हर्बल पावडर तयार होईल. या पावडरने तुम्ही हिरड्यांची आणि दातांची नीट दररोज दोनदा सफाई केल्यास तुमचे दात आणि हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे दातांना कॅव्हिटी लागण्याची समस्या कमी होऊन दात चमकायला लागतील. 


तोंडाची दुर्गंधी होईल कमी : 


या पावडरचा वापर केल्यास दातांची सफाई तर होतेच, मात्र याचे आणखीनही चांगले फायदे आहेत. जर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीची समस्या सतावत असेल तर ही समस्याही कमी होईल.  


याशिवाय कोणते पर्याय वापरू शकतात? 


दातांची कॅव्हिटी कमी करण्यासाठी, दातांना सडण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही या पावडरचा वापर करू शकतात. यासोबत तुम्ही तुमच्या टूथपेस्टमध्ये दालचिनीचे तेल टाकून ब्रश करू शकतात. असं केल्याने तोंडातील दुर्गंधी कमी होते. तुम्ही दालचिनीऐवजी लवंगाचं तेलदेखील वापरू शकतात. याने तुमच्या दातातील कॅव्हिटी कमी होण्यास मदत होईल.


home made herbal powder for tooth cavity and bad breath know full process of making