मुंबई : आजकाल व्यस्त जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, खाण्यापिण्यासोबतच झोपण्याच्या विचित्र वेळा या कारणांसोबतच केसांची पुरेशी निगा न राखल्याने केसगळतीची समस्या वाढली आहे. केसगळतीचा त्रास हा तरूणपिढीमध्ये प्रामुख्याने आढळतो आहे. त्यामुळे केसांचे आरोग्य जपण्यासाठी विशेष काळजी  घेणं आवश्यक आहे. लांबसडक, काळेभोर आणि हेल्दी केसांसाठी महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्सपेक्षा सुरूवातीच्या टप्प्यात तेलाचा मसाज करणंदेखील फायदेशीर ठरते. आजकाल नियमित केसांना तेल लावणं हे दुर्मिळ होत चाललं आहे. म्हणूनच केसगळती रोखण्यासाठी हा घरगुती उपाय नक्की आजमावून पहा. 


कसे बनवाल तेल ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 व्हिटॅमिन ई कॅपसुल्स
2 टेबलस्पून नारळाचं तेल  
1 टेबलस्पून बदामाचं तेल  
2 टेबलस्पून एरंडेल तेल 


हे मिश्रण नीट एकत्र करून हवाबंद बाटलीमध्ये साठवून ठेवणं शक्य आहे.


कसा कराल या तेलाचा वापर 


आठवड्यातून एकदा रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने किमान 10 मिनिट मसाज करा. रात्रभर हे तेल केसांवर लावून ठेवावे. दुसर्‍यादिवशी केस सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवावेत. 


कसा होईल फायदा ?


या तेलाच्या नियमित मसाजामुळे केस आरोग्यदायी राहण्यास मदत होते. 
या तेलामुळे टाळूवरील pH लेव्हल नियमित ठेवण्यास मदत होते. 
केसगळतीचा त्रास आटोक्यात राहतो. 
या तेलाच्या मसाजामुळे केसांना चमक मिळण्यास मदत होते.