देशभरात उष्णतेची लाट वाढल्याने सरकारकडून नागरीकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. वाढत्या गर्मीमुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर येत असतो, त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते.शरीरातील उष्णता घामावाटे बाहेर पडते. मात्र काही जणांना बारमाही खूप घाम येतो.प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असल्यास ही गंभीर लक्षण समजलं जातं. हाइपरहाइड्रोसिसमध्ये तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो.


घाम येण्याची कारणं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्माीमुळे सतत घाम येणं हे नैसर्गिक आहे. घामावाटे शरीरातील सोडीयम बाहेर पडतं.अतिरिक्त गर्मीमुळे शरीराचं तापमान वाढतं त्यामुळे गर्मीत घाम जास्त येतो. 


कॅफेनयुक्त पदार्थांचं सेवन करणं 
बऱ्याच जणांना चहा आणि कॉफीचं मोठ्या प्रमाणात व्यसन असल्याने दिवसातून चार ते पाच कप चहाचं सेवन केलं जातं. चहा आणि कॉफीमध्ये कॅफेन जास्त असतं, त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त कॅफेन शरीरात गेल्याने शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. ही उष्णात घामावाटे बाहेर पडते. 


औषधांची मात्रा 
कोणत्याही दिर्घ आजारामुळे तुम्ही सतत गोळ्या औषधं घेत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते. त्याचप्रमाणे सतत चमचमीत पदार्थ खाल्याने किंवा गरोदपणात ही भरपूर घाम येतो.  


अल्कोहोलचं सेवन 
जर तुम्हाला दारुचं आणि सिगारेटचं व्यसन असल्यास शरीतील उष्णता झपाट्याने वाढते. रक्तात मिसळलेलं अल्कोहोल घामावाटे बाहेर पडतं, त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. 


सतत घाम येऊ नये म्हणून घरगुती उपाय 


मीठाच्या पाण्याने अंघोळ करणं 
सैंधव (काळं ) मीठ , खडा मीठ किंवा जेवणासाठी वापरलं जातं त्या मिठाने अंघोळ करणं फायदेशीर मानलं जातं. घामामुळे त्वचेला पुरळ येणं, अ‍ॅलर्जी होणं किंवा खाज येणं या समस्या होतात. मिठामध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असल्याने त्वचेचे विकार दूर होण्यास मदत होते. अंघोळीच्या पाण्यात चमचाभर मीठ टाकून अंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी दूर होते. 


 कडुलिंबाची पानं
कडुलिंबाची पानं त्वचा विकारावर गुणकारी मानली जातात. कडुलिंबाच्या पानांचा गुणधर्म थंड असल्याने शरीरातील तापमान कमी करण्यास मदत होते. घामामुळे शरीरावर जमा झालेले बॅक्टेरिया कडुलिंबाच्या  पानांमुळे दूर होतात. अंघोळीला जाताना पाण्यात आठ ते दहा पानं टाकल्याने त्वचेवरील अ‍ॅलर्जी नाहीशी होते. त्याशिवाय कडुनिंबाच्या पानांचा वापर बॉडीस्क्रब म्हणूनही केला जाऊ शकतो, यामुळे घाम नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


कापूर किंवा निलगीरी तेल
ऑफिसमधून घरी आल्यावर हात पाय न धुता अंघोळ करणं फायदेशीर ठरतं. प्रवासात आलेला घामामुळे आजुबाची उडणारी धूळ शरीरावर घट्ट बसून राहते. अंघोळीच्या पाण्यात कापूर किंवा निलगीरी तेलाचे थेंब टाकल्याने शरीरावरील बॅक्टेरीया नाहीसा होतो.त्याशिवाय थकवा दूर होण्यास मदत होते. याशिवाय  शरीरातील तापमान कमी करण्यास मदत करतं, त्यामुळे घाम नियंत्रणात राहतो. अंघोळीच्या पाण्यात  कापूर किंवा निलगीरी तेलाचे दोन टाकल्याने शरीराची दुर्गंधी दूर होते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)