मुंबई : केळं खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहित आहेत. केळ्यात पोषक तत्व सर्वाधिक प्रमाणात असतं यामुळे याचं सेवन केल्यावर अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार, केळं खाल्याने शरिरात ऊर्जा आणि शक्ती निर्माण होते. त्यामुळे जर तुम्ही केळं खात नसाल तर लवकरच ते खायला सुरूवात करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला केळ्याचं कसं करावं जे तुम्हाला सर्वाधिक जास्त फायदा देईल हे सांगणार आहे. उकळलेलं केळं खाल्यमुळे तुम्हाला तुमच्या शरिरात खूप लवकरच वेगळा बदल पाहायला मिळेल. रात्री झोपण्याअगोदर उकळलेलं सोनं खाल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. 


शरीराला कॅल्शिअम मिळणार 


औषधीय असलेलं केळं अतिशय फायदेशीर असतं. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा चांगली झोप लागत नसेल तर याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. कारण केळ्याचं सेवन केल्यावर ही समस्या दूर होईल. झोप येत नसल्यास सालीसह केळ्याची चहा बनवून प्यायलास याचा फायदा होईल. एक आठवडा असं केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसेच सकाळी स्वतःला रोजच्यापेक्षा अधिक फ्रेश अनुभवाल. तसेच केळ्यात असणाऱ्या कॅल्शिअममुळे शरिरात ताकद निर्माण होते. आणि हाडांना मजबूती देखील मिळते. 


बनवण्याची पद्धत 


झोपेची समस्या सतावत असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून पाहा. लहान आकाराचे केळं, दालचिनीचा तुकडा आणि एक कप पाणी घ्या. एका भांड्यात पाणी आणि दालचिनी घेऊन उकळा. पाणी चांगल उकळल्यानंतर केळ्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाका. हे मिश्रण 10 मिनिटे कमी आचेवर शिजवा. यानंतर हे सर्व मिश्रण चहा प्रमाणे घ्या. 


असं केल्यानंतर झोपेच्या समस्यांपासून तर सुटका होईल किंवा रात्री झोपेत सतत जाग येण्याची समस्या असेल त्याला देखील फायदा होईल. असंच नाही तर केळ्याची साल देखील सर्वात गुणकारी आहे. केळ्याच्या सालीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटेशिअम असते.