मुंबई : मुंगी चावल्यावर तुम्ही काय करता ? त्यासाठी ऑईन्मेंट शोधण्यापेक्षा आपल्या घरातील नैसर्गिक उपाय करून बघा. मुंग्या चावल्यावर येणारी खाज आणि सूज कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय... 


बर्फ:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहीही चावल्यानंतर त्यावर बर्फ लावणे हा अतिशय परिणामकारक घरगुती उपाय आहे. बर्फ लावल्याने मुंगी चावल्यानंतर होणारी जळजळ, खाज, सूज कमी होण्यास मदत होते. 


खोबरेल तेल:


मुंग्या चावल्यावर त्याठिकाणी थोडेसे खोबरेल तेल घालून चोळा. त्यामुळे खाज, सूज कमी होईल व खोबरेल तेलातील अँटी इंमफ्लामेंटरी गुणधर्मामुळे मुंग्या चावल्यावर होणारी जळजळ देखील कमी होण्यास मदत होईल. 


कोरफड:


त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी असलेली कोरफड मुंग्या चावल्यावर देखील उपयुक्त ठरते. कोरफडीचे छोटेसे पान घेऊन ते मधून कापा व आतील गर मुंग्या चावलेल्या ठिकाणी अलगद चोळा. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज कमी होण्यास मदत होते. 


टी बॅग:


मुंग्या चावल्यावर टी बॅग ओली करून त्याठिकाणी सावकाश ठेवा. चहातील tannic अॅसिडमुळे त्यात अँटी इंमफ्लामेंटरी गुणधर्म असतात. त्यामुळे खाजेबरोबर सूज देखील कमी होण्यास मदत होते. 


विन्हेगर:


कापसाच्या बोळ्यावर थोडेसे विन्हेगर घेऊन मुंग्या चावलेल्या ठिकाणी हलक्या हाताने लावा. हा देखील एक सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहे. यामुळे खाज, सूज, जळजळ कमी होते. त्याचबरोबर खाजवल्यामुळे येणारे ओरखडे कमी होण्यास मदत होते.