कांजण्यावर हे घरगुती उपाय नक्कीच ठरतील रामबाण!
कांजण्या येणं ही एक वायरल समस्या आहे.
मुंबई : कांजण्या येणं ही एक वायरल समस्या आहे. ज्यामध्ये कांजण्याचे फोड येऊन त्याला खाज आणि फ्लू सारखी लक्षणं दिसतायत. लहान मुलांमध्ये अधिकतर ही समस्या दिसून येते. दरम्यान औषधांबरोबरच काही घरगुती उपाय देखील कांजिण्यांच्या उपचारांत उपयुक्त ठरू शकतात. असे काही घरगुती उपायां आहेत ज्यामुळे लहान मुलाची या संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढेल आणि त्याला लवकर बरे होण्यास मदत होईल.
कॅलामाईन लोशन
कॅलामाईन लोशन खाज कमी करण्यास मदत करू शकतं. या लोशनमध्ये त्वचा थंड आणि आराम देण्याचे गुणधर्म आहेत. यात झिंक ऑक्साईड देखील समाविष्ट आहे. कापसाद्वारे हे लोशन खाज येत असलेल्या जागी लावावं.
ओटमील बाथ
ओटमील बाथमुळे कांजिण्यांना येणाऱ्या खाजेपासून आराम मिळू शकतो. आपण घरी ओटमील बाथ देखील तयार करू शकता.
मोठ्या मुलांसाठी एक कप आणि लहान मुलासाठी ⅓ कप ओट्स घ्या. ओट्स अनफ्लेवर्ड, मंद शिजवलेले असावेत. आपण फूड प्रोसेसरमध्ये ओट्सचे तुकडेही करू शकता.
आता एका टबमध्ये कोमट पाणी घाला आणि एका ग्लासमध्ये एक चमचा ओट्स घाला. जर ओट्स पाण्यात शोषले गेले आणि पाणी दुधाळ झाले तर याचा अर्थ असा होतो की ओट्स पुरेसे विरघळले आहेत. नंतर टबच्या पाण्यात एक ग्लास पाणी घाला आणि मुलाला 20 मिनिटे टबमध्ये बसवा. आपण बाळाला ओटमील लोशन देखील लावू शकता.
कॅमोमाइल टी
स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या कॅमोमाइल चहामुळे कांजिण्यामुळे होणारे खाज सुटणं देखील बरे होऊ शकतं. कॅमोमाइलमध्ये एन्टीसेप्टिक आणि अॅन्टी-इंफ्लामेट्री गुणधर्म आहेत. आंघोळीच्या पाण्यात दोन ते तीन कॅमोमाइल टी बॅग ठेवा. आता या पाण्यात स्वच्छ कापड भिजवून खाजलेल्या त्वचेवर लावा. यानंतर त्वचा पूर्णपणे कोरडी करा.
जर तुमच्या मुलाला कांजण्या येत असतील आणि त्याला ताप येत असेल तर मुलाला औषध दिलं पाहिजे. वेदना कमी करण्यासाठी एसेटामिनोफेन घेतलं जाऊ शकतं. शक्य असल्यास इबुप्रोफेन घेणं टाळा कारण यामुळे त्वचेला गंभीर संक्रमण होऊ शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या मुलाला कोणतेही औषध देऊ नका.