मुंबई : नाशिक जिल्ह्यातील पेठ कळवण सुरगाणा भागात सध्या अतिसाराच्या साथीनं धुमाकूळ घातला आहे. या साथीमुळे आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दोन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. गेल्या आठवड्याभरात जवळपास २०० अतिसाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या साथीपासून लांब राहण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करु शकता. अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणं तसंच मल पातळ होण्याचं प्रमाण वाढणं, पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब ही दोन अतिसाराची लक्षणं असू शकतात. अस्वच्छ आहार आणि अशुद्ध पाण्यामुळं हा आजार होतो.


अतिसार / डायरियावर घरगुती उपाय


जास्त पाणी प्यावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायरिया झाल्यानंतर 1 ते 2 तासाच्या अंतरात कमीतकमी 1 लीटरपेक्षा अधिक पाणी पिलं पाहिजे. पाणी पित राहिल्याने शरिरातील पाणी कमी नाही होणार. मिठाचे बारीक बारीक खडे चाटून खा. किंवा मीठ आणि पाणी यांचं मिश्रण करुन ते प्यावे.


ओरल रिहायड्रेशन सॉल्ट घ्या


डायरिया झाल्यानंतर शरीरातील द्रव आणि मिनरल सॉल्ट शरीरातून बाहेर पडतं. याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस घेऊ शकता. ओरल रिहायड्रेशन सॉल्ट तुम्हाला मेडिकलमध्ये सहज मिळेल.


अद्रकचा चहा


अद्रकचं सेवन केल्याने अतिसार/डायरिया पासून आराम मिळतो. अद्रकचा चहा प्यायल्याने त्रास कमी होतो. अद्रकचा रस, लिंबूचा रस आणि काळी मिरीची पावडर पाण्यात एकत्र करुन प्यायल्याने देखील आराम मिळतो.


केळी आणि सफरचंद


केळी आणि सफरचंद यांचं मिश्रन ज्याला ब्रॉट असं देखील म्हणतात. याचं सेवन केल्याने डायरियापासून आराम मिळतो. केळी खालेल्या गोष्टी आतंड्यांमध्ये धरुन ठेवण्याचं काम करतो. सफरचंद आणि केळी खाल्याने त्यातील पेक्टिन अतिसारला कमी करतो.


भात


अतिसाराची लागण झाल्यास त्यावर भात खूप फायदेशीर ठरतो. भात आतड्यांमधील प्रकियेची गती कमी करतो आणि अतिसार थांबवतो.


जेवणं बंद नका करु


डायरिया झाल्य़ानंतर जेवणं अजिबात बंद करु नका. केळी, भात यांचा जेवणात अधिक वापर करा. अतिसारामध्ये अधिक पोषक आणि द्रव पदार्थ घेतले पाहिजे. अतिसारात 48 तासादरम्यान मसाल्याचे पदार्थ, फळं आणि अल्कोहोलचा प्रयोग करु नये. 


दूधाचं सेवन करु नका


अतिसार झाल्यावर दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ खाऊ नका. दूध किंवा त्यापासून बनलेले पदार्थ लवकर पचत नाही.