हिवाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय
थंडीच्या मोसमास आता सुरूवात झाली आहे
मुंबई : थंडीच्या मोसमास आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणं फारजेच आहे. थंडीमध्ये ताप, सर्दी, खोकला इत्यादी आजार डोकं वर काढतात. त्यामुळे मात्र, हे साधे वाटणारे आजार आपल्याला हैराण करतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण लोकरीचे कपडे परिधान करतो. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतो. मात्र, थंडीपासून आजार टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करा.
थंडीत चिकन सूप प्या. चिकन सूप घेतल्याने थंडीपासून तुमचा बचाव होता. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चिकन सूप त्यापासून तुमची सुटका करते. चिकन सूपमधील कार्बोहाइड्रेट ऊर्जा वाढविण्यासाठी मदत करते.
कोरडी पडणाऱ्या त्वचेला कोरफड लावा. थंडीमुळे आपली त्वचा शुष्क होते. किंवा कोरडी पडते. त्वचा चांगली आणि नितळ राहण्यासाठी तुम्ही कोरफड लावा. AloeVera mask मधून antioxidants आणि जीवनसत्त्वे त्वचेला मिळातात. त्यामुळे कोरफड थंडीत फायदेशीर ठरते.
बडीशेफ कफावर उत्तम आहे. थंडीत आपल्याला सर्दी होते. त्यामुळे कफ होतो. कफ झाल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळते. आपली पचन क्षमताही बिघडते अशावेळी बडिशेफ खाणे चांगले. त्यामुळे आपल्याला आराम पडतो.