नवी दिल्ली : लांबसडक, काळेभोर केस असावे, असे प्रत्येकीला वाटते. मात्र आजकालच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत केसांची काळजी घेणे फारसे जमत नाही. त्याचबरोबर ताण-तणावामुळे केसगळतीची समस्या उद्भवते. बाजारात उपलब्ध असलेल्या शॅम्पूतील हानीकारक केमिकल्समुळे देखील केसांचे नुकसान होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या समस्येवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. केस लांबसडक होण्यास उपयुक्त असे उपाय.


बटाट्याचा रस 
२-३ बटाटे किसून त्याचा रस काढा. तो रस केसांना लावून १५ मिनीटांनी केस धुवा. बटाट्यात असलेल्या व्हिटामिनमुळे केस मजबूत आणि लांबसडक होतील.


कोरफड 
खोबरेल तेलात कोरफडीचा गर घालून केसांना मसाज करा. कोरफडीचा रस प्यायल्याने देखील फायदा होईल.


आवळा
आवळा पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावा. थोड्या वेळाने केस कोमट पाण्याने धुवा.


लिंबाचा रस
लिंबाचा रस २ चमचे कोमट पाण्यात मिसळून त्याने केसांना मसाज करा. अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पू लावून धुवा. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.


दही आणि अंडे
अंड्याच्या सफेद भागात २ चमचे दही घालून ते मिश्रण केसांना लावा. मिश्रण सुकल्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा.