मुंबई : दिवसेंदिवस शहरात वाढणाऱ्या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया  यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही  वाढले आहे. मग डासांना  दूर  करण्यासाठी बाजारात उपलब्ध  असलेली केमिकलयुक्त उत्पादनांचा परिणाम उलटा आपल्याच आरोग्यावर होतो. संध्याकाळच्या वेळेस बागेत मुलांना खेळायला पाठवताना बाजारात मिळणाऱ्या क्रिम्सचा सर्रास वापर केला जातो. किंवा घरात येणाऱ्या डासांना घरगुती उपायांनी पळवून लावता येऊ शकते. तर बाहेर मिळणाऱ्या विविध उत्पादनांपेक्षा हे सोपे उपाय नक्की करुन पहा...


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम ८ तास राहतो.

  • घरात कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि १५-२० मिनिटे त्याचा धूर होऊ द्या. डास दूर पळून जातील.

  • लिंबाचे आणि निलगिरीचे तेल सम प्रमाणात मिक्स करुन शरीरावर लावा. त्यामुळे मच्छर तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.

  • दारात किंवा खिडकीत तुळस असल्यास मच्छर दूर पळून जातात. मच्छरांना घरात प्रवेश करण्यास तुळस प्रतिबंध करते. 

  • लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यामुळे लसूण किसून पाण्यात उकळवा आणि रुममध्ये ठेवा. डास दूर पळतील.

  • लव्हेंडरचा सुगंध खूप तेज असतो आणि डास तिथे फिरकत नाहीत. म्हणून घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनर वापरा.