Home Remedies to Reduce Rat Problems: घरात उंदीर कसे होतील याचा काही नेम नाही. उंदीर झाले की अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यांच्या वापरामुळे आपल्याला अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे उंदीर झाल्यावर आपण नाना तऱ्हेचे उपाय करून बघतो. परंतु तुम्हाला माहितीये का की कांदा आणि लसूण यांच्या वापरामुळेच उंदीरांना आपण पळवून लावून शकतो. त्यामुळे लसूण आणि कांदा यांसारख्या उर्ग पदार्थांमुळेच आपल्याला उंदीरांपासून मुक्तता मिळू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसणाचा उपयोग (Benefits of Garlic For Rat Problem)


लसूण ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या घरी असेलच असेल. लसूणाचा वापर आपल्या स्वयंपाक घरात होतोच होतो. पण तुम्हाला माहितीये का लसणामुळं तुम्ही घरतल्या उंदीरांपासून चटदिशी मुक्तता मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही थोड्याच गोष्टी कराव्या लागतील. लसणाच्या पाकळ्या पाण्यामध्ये एकत्र करून त्याची पेस्ट (Garlic Paste) बनवुन घ्यावी आणि उंदीर ज्या ठिकाणी फिरतात त्या ठिकाणी ही पेस्ट टाकावी. 


लसणाच्या उग्र वासामुळे उंदीर आपोआपच आपल्या घरा बाहेर पळतात. लसूण पेस्टच्या जागी लसणाच्या पाकळ्या जरी ठेचुन टाकल्या तरी देखील त्याचा फायदा उंदीर पळवण्यासाठी फायदा होतो. 


कांद्याचा उपयोग (Benefits of Onion For Rat Problem) 


जसा कांद्याचा वास (Onion Smell)  माणसाला सहन होत नाही अगदी त्याच प्रमाणेच तो उंदरांना ही सहन होत नाही. उंदरांना ही कांद्याच्या वासाचा त्रास होतो. कांद्याचा हा उर्ग वासंच घरातील उंदीर पळवण्यासाठी कारणीभूत ठरतो. कांदा जर खराब झाला असेल तर त्याचा उंदीर पळवण्यासाठी जास्च फायदा होतो. यांच्या उर्ग वासामुळे उंदरांचा मृत्यूही उद्धवतो. 


घरातील उंदरांना हाकलण्यासाठी कांदा हे एक उत्तम शस्त्र आहे. कांदे कापून उंदरांच्या लपण्याच्या ठिकाणी ठेवा. कांद्याचा उग्र वास उंदरांपर्यंत पोहोचताच ते त्या ठिकाणाहून दूर पळून जातात. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)