मुंबई : स्ट्रेच मार्क्स साधारणपणे पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर येतात. अचानक वजन वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात. त्यामुळे प्रेगन्सीमध्ये किंवा टीनएजर्स (ज्यांच्यामध्ये पौगंडावस्थेत हार्मोनल चेंजेस होतात) याचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी काही घरगुती उपाय ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरफडीमध्ये त्वचेची आद्रता टिकवून ठेवण्याची क्षमता असते. कोरफड कापून त्यातील आतील गर स्ट्रेच मार्क्स वर लावा. असे नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होतील. कोरफडीचा गर व्हिटॅमिन इ ऑइल मध्ये घालून ते मिश्रण देखील तुम्ही वापरू शकता.


खोबरेल तेल, एरंडेल तेल त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइल अशा तेलांचा वापर त्वचेतील आद्रता टिकवण्यासाठी केला जातो. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइल थोडं गरम करून स्ट्रेच मार्क्स वर लावा. सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. ऑलिव्ह ऑइल आणि खोबरेल तेल एकत्र करून ही तुम्ही लावू शकता. एरंडेल तेल वापरताना कोमट करून स्ट्रेच मार्क्स वर लावा आणि कपडा गरम पाण्यात ओला करून त्याभोवती गुंडाळून ठेवा. कपड्याऐवजी प्लास्टिक शीटचा देखील तुम्ही वापर करू शकता. किंवा गरम पाण्याच्या पिशवीने तो भाग शेकवा. वाफेमुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात आणि तेल आत मुरायला मदत होते.


अंड्याचा सफेत भाग प्रोटीनने युक्त असल्याने स्ट्रेच मार्क्सवर अतिशय गुणकारी आहे. २ अंड्यांचा सफेद भाग घेऊन स्ट्रेच मार्क्सवर जाडसर थर लावा. थर पूर्णपणे सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा. आणि मग त्यावर ऑलिव्ह ऑइल लावा.


लिंबू हे नैसर्गिक ब्लिच आहे आणि ते अ‍ॅसिडिक असल्याने स्ट्रेच मार्क्सवर फायदेशीर ठरते. लिंबाचा रस सावकाश स्ट्रेच मार्क्स वर लावा. १० मिनिटं ठेऊन गरम पाण्याने धुवून टाका. दिवसातून १-२ वेळा असे केल्याने चांगला फरक पडतो.


नियमितपणे मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते. आणि त्याचा परिणाम म्हणजे स्ट्रेच मार्क्सची तीव्रता कमी होते. कोको बटर किंवा कोरफड युक्त मॉइश्चरायझर नियमित वापरा. किंवा सम प्रमाणात कोरफड आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून घरच्या घरी मॉइश्चरायझर तयार करा.


व्हिटॅमिन इ मध्ये antioxidant properties असल्यामुळे collagen डॅमेज होण्यापासून बचाव होतो. म्हणजेच त्वचा सुरक्षित राहते. खूप काळापासून असलेले स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी व्हिटॅमिन इ युक्त ऑइलचा नियमित वापर करा. नक्कीच फरक दिसून येईल.