उन्हाळ्याच्या दिवसांत कामी येतील आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय; `या` समस्यांपासून मिळेल मुक्ती
Home Remedies For Summer: उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक तक्रारी उद्भवू शकतात. यावेळी आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांपासून सुटका होण्यासाठी काय उपाय करू शकतो, हे पाहूयात.
Home Remedies For Summer: उन्हाळ्याच्या दिवसांत ( Summer Days ) बाहेर पडायचं म्हणजे अगदी नकोसं होतं. या काळात उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी आपण ना-ना पद्धतीचे उपाय करतो. प्रखर उन्हामुळे आपल्या त्वचेला तर आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी आज आम्ही तुम्हाला खास उपाय सांगणार आहोत. जाणून घेऊया कोणत्या, समस्येला तुम्ही कोणते उपाय ( Home Remedies For Summer ) वापरू शकता.
एसिडीटीपासून ( Acidity Problem ) आराम मिळावा यासाठी
उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा एसिडीटीचा ( Acidity ) अधिक त्रास होताना दिसतो. अशावेळी विविध उपाय करून देखील एसिडीटीपासून ( Acidity ) मुक्तता मिळत नाही. अशावेळी लवंगाचा एक तुकडा तुमची मदत करू शकतो. एसिडीटीचा त्रास जाणवल्यास तोंडात लवंगाचा तुकडा ठेवावा. यामुळे एसिडीटी कमी होण्यास मदत होते.
पुरळ ( Acne Problem ) आल्यास हे उपाय कराल
उन्हाळ्याच्या दिवशी त्वचेच्या समस्या अधिक जाणवू लागतो. यावेळी तुम्ही काकडीचा ( Cucumber ) वापर करू शकता. काकडीमध्ये ( Cucumber ) भरपूर पाण्याचं प्रमाण असतं. त्वचेला जर पुरळ येण्याची समस्या जाणवत असेल तर काकडी सोलून तिचा किस करून घ्या. हा किस तुम्ही चेहरा आणि मानेवर लावून घ्या. यामुळे पुरळ आणि ब्लॅकहेड्स ( Blackhead ) दूर होण्यास मदत होते.
कोरडा खोकला
उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याच्याही अनेक तक्रारी उद्भवतात. यावेळी कोरड्या खोकल्याचा त्रास अधिकतर लोकांना जाणवतो. जर तुम्हाला या दिवसांत कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर एका पातेल्यात दूध घेऊन त्यात 5 खजूर घाला. साधारण 25 मिनिटं मंद आचेवर हे दूध उकळा. याच्या सेवनाने तुम्हाला कोरड्या खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होणार आहे.
तोंडाला येणारी दुर्गंधी
प्रत्येकालाचा ही समस्या जाणवेल असं नाही, मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत तोंजाला दुर्गंधी येण्याची समस्या काहींना जाणवते. काही उपाय केल्यानंतर तात्पुरती ही समस्या दूर होते. यावर एक जालीम उपाय म्हणजे, तुम्ही तुळशीची 4-5 पानं चावून खाऊ शकता. यामुळे तुमच्या मुखाला येणारी दुर्गंधी दूर होणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)