मुंबई : कोणताही मौसम असो पण उन्हामुळे हात-पायाची त्वचा टॅन होते. त्वचा काळवंडण्याची अनेक कारणे असतील पण याकडे थोडे लक्ष दिले तर ही समस्या दूर होऊ शकते. त्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करुन तुम्ही हात-पायाची त्वचा उजळवू शकता. त्याचबरोबर त्वचा नितळ, मुलायम होईल. पहा कोणते आहेत ते घरगुती उपाय....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#1. लिंबात साखर घालून हाता-पायाच्या काळवंडलेल्या त्वचेवर रगडा. असे आठवड्यातून दोन-तीन वेळा ट्राय करा. काही दिवसातच काळवंडलेली त्वचा दूर होईल. 


#2. कोरफड जेल हाता-पायाला लावा. ५ मिनिटे मसाज करा आणि ३० मिनिटांनी पाण्याने हात-पाय स्वच्छ धुवा.


#3. संत्र्याच्या साली वाटून पावडर करा. त्या पावडरमध्ये दही घाला आणि पेस्ट हाता-पायाला लावा. फायदा होईल.


#4. टॉमेटोमध्ये लायकोपेन नावाचे अॅंटीऑक्सीडेंट असते. ते ब्लीचचे काम करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि त्वचेचा रंग उजळतो. त्यासाठी टॉमेटो त्वचेवर रगडा. असे नियमित केल्याने हाता-पायाच्या त्वचेवर चमक येईल.


#5. हळदीत कच्चे दूध मिसळा आणि त्वचेवर लावा. नक्कीच फायदा होईल.


#6. चंदन पावडरमध्ये लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घालून पेस्ट बनवा. त्वचेवर लावा. १५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ करा. त्वचा उजळण्यास मदत होईल.