मुंबई : बदलत्या जीवन शैलीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसत आहे. वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण सतत प्रयत्नशील असतो. वजन कमी करण्यासाठी लोकं विविध प्रकारच्या औषधांचा देखील वापर करतात. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या औषधांचा वाईट परिणाम शरीरावर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करण्याचं मोठं रहस्य तर आपल्या स्वयंपाक घरात दडलेलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेथीच्या बिया : एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो. 


जिरे: शरीरातील अनावश्यक चरबी बाहेर काढण्यास जिरे मदत करते. तसेच जिरेपूड खल्ल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका. भाजलेले हिंग, जिरे, काळे मिठ आणि पावडर १-३ ग्रॅम समान प्रमाणात करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा दह्यासोबत घ्या. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल 


लसूण: लसणामध्ये एलिसिन घटक मुबलक प्रमाणात आढळत असल्याने फॅट बर्न करण्यास मदत होते. यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. लसणामध्ये फायबर्स घटक बद्धकोष्ठता, पचनाचे विकार कमी करण्यास मदत करतात.


मध आणि लिंबू : सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू पिळून ते पाणी प्यावे. यामुळे सारख्या लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण राहाते.